Manoj Jarange Patil Sabha In Kolhapur: छत्रपतींना व्यासपीठावर स्थान द्यावे, मनाेज जरांगे पाटलांची इच्छा; जाणून घ्या काेल्हापुरातील वाहतुकीतील बदल

ऐतिहासिक दसरा चौकात जरांगे पाटील यांची उद्या जाहीर सभा होणार आहे.
prepration for manoj jarange patil sabha in kolhapur tomorrow
prepration for manoj jarange patil sabha in kolhapur tomorrow saam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

मनाेज जरांगे पाटील यांच्या काेल्हापूरातील सभेच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज युद्धपातळीवर तयारी करत आहे. दूसरीकडे काेल्हापूर पाेलीस दलाने देखील सभेच्या दृष्टीने वाहतुकीत बदल, कायदा व सुव्यवस्थेसाठी चाेख बंदाेबस्ताचे नियाेजन केले आहे. (Maharashtra News)

prepration for manoj jarange patil sabha in kolhapur tomorrow
Raghunathdada Patil News : कायदा नव्हे केवळ बियाणे कंपन्याकडून पैसे उकळण्याचा सरकारचा उद्देश : रघुनाथदादा पाटील

मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil latest marathi news) यांनी तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात केली आहे. ते उद्या (शुक्रवार, ता. 17 नाेव्हेंबर) दुपारी तीन वाजता कोल्हापुरात (kolhapur) दाखल होणार आहेत. ऐतिहासिक दसरा चौकात जरांगे पाटील यांची जाहीर सभा देखील होणार आहे.

या सभेसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. या सभेला तब्बल दोन लाख लोक येणार असल्याचे मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. ही सभा व्यवस्थित पार पडावी या दृष्टीने पोलिसांकडून देखील नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काेल्हापुर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (ips mahendra pandit) यांनी आज (गुरुवार) सभा स्थळाची पाहणी केली.

वाहतुक राहणार बंद

साम टीव्हीशी बाेलताना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले शाहू समाधीस्थळी मनाेज जरांगे पाटील हे दर्शन घेतील. त्यानंतर सभास्थळी येतील. या सभेच्या पार्श्वभूमीवर दसरा चाैक (dasara chowk) ते व्हीनस काॅर्नर (venus corner kolhapur), सीपीआर चाैक या चारही दसरा चाैक मार्गावरील वाहतुक बंद करण्यात येणार आहे. पर्यायी वाहतुक व्यवस्था करण्यात येईल. त्याचे सविस्तर नियाेजन लवकरच पाेलीस दल जाहीर करेल. सीपीआर रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेला अडचण येणार नाही असे देखील नियाेजन केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या सभेसाठी 30 अधिकारी तसेच 300 पाेलीस कर्मचारी सभेच्या बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. याबराेबरच वाहतुकीच्या नियाेजनासाठी 10 अधिकारी तसेच 200 पाेलीस कर्मचारी असणार आहेत.

छत्रपती शाहू महाराज यांची सभेला उपस्थिती असणार

दरम्यान मराठा महासंघचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक (vasant mulik) म्हणाले या सभेसाठी लाखाे मराठा बांधव येणार आहेत. या सभेला छत्रपती शाहू महाराज हे उपस्थित राहणार आहेत. त्याविषयी मनाेज जरांगे पाटील यांनी आनंद व्यक्त केला असेही मुळीक यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या गादीविषयी सर्वांनाच प्रेम आहे. त्यांना ऐकायला मिळेल. दरम्यान शाहू महाराज यांना समाज बांधवांनी व्यासपीठावर स्थान द्यावे असे वक्त्याची (मनाेज जरांगे पाटील) इच्छा असल्याचे मुळीक यांनी माध्यमांशी बाेलताना म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

prepration for manoj jarange patil sabha in kolhapur tomorrow
Raju Shetti : साखर कारखानदारांची आज स्वाभिमानी समवेत महत्वपूर्ण बैठक, बोलणी फिस्कटल्यास... राजू शेट्टींचा गंभीर इशारा (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com