- रणजीत माजगावकर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (SWABHIMANI SHETKARI SANGHATANA) मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी आज (गुरुवार) दुपारी 4 वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी साखर कारखानदार आणि शेतकरी यांची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीत स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी हे उपस्थित राहणार आहे. दरम्यान आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. या चर्चेत बोलणी फिस्कटली तर आमचे आंदाेलनाचे नियाेजित कार्यक्रम ठरल्यानूसार हाेतील असा इशारा देखील शेट्टींनी साम टीव्हीशी बाेलताना प्रशासनास दिला. (Maharashtra News)
राजू शेट्टी म्हणाले साखर कारखानदारच ऊस पेटवतात. त्यांचे बगलबच्चे ऊस पेटवताहेत. शेतकऱ्याने हतबल व्हावं आणि जळका ऊस न्यावा असं कारखानदारांच्या मागे लागावं आणि कारखाने चालू करा असं म्हणावं यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.
त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपल्या उसाची राखणी सुरू केलेली आहे. आमच्या फडात एखादा घुसला तर नक्की आम्ही त्याला चोप देऊ असा इशारा देखील शेट्टींना दिला.
शेट्टी म्हणाले पैशांचा आणि सत्तेचा माज आल्यानंतर महिला भगिनींसोबत अशा पद्धतीचे गैरवर्तन करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. परंतु त्यांनी लक्षात ठेवावा हीच गोरगरीब माणसं आपल्याला मत देतात हीच माणसं मत देऊन आपल्याला कारखाना ताब्यात देतात किंवा सत्ता स्थान देतात. त्यांची अशी अवहेलना केली तर जनता कधीच माफ करणार नाही.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राजू शेट्टी पुढे म्हणाले आम्ही 400 रुपये मागतो ही मागणी तंतोतंत बरोबर आहे. तरीसुद्धा कुठेतरी चर्चेला बसल्यानंतर वाटाघाटीला बसल्यानंतर थोडं फार मागे याव लागेल म्हणून 400 च्या आकड्याशी आम्ही चिकटून नाही. एखाद दुसरे पाऊल मागे यायला तयार आहोत पण याचा अर्थ नुसता प्रसाद द्यावा हे आम्हाला मान्य होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
आजची चर्चा फिस्कटल्यास
- 17 तारखेला गृहमंत्र्यांना घेराव घालणार.
- 19 तारखेला चक्काजाम आंदोलन.
- पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.