Jayakwadi Dam : सर्वपक्षीय नेत्यांचा ठरावावर शिक्कामाेर्तब, नगरचे पाणी जायकवाडीला नकाेच

या बैठकीत भंडारदरा, निळवंडे, गोदावरी आणि मुळा धरणातील पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन निश्चित करण्यात आले.
all political parties from nagar opposed to release water for jayakwadi dam in presence of radhakrishna vikhe patil
all political parties from nagar opposed to release water for jayakwadi dam in presence of radhakrishna vikhe patilsaam tv
Published On

- सुशिल थाेरात / सचिन बनसाेडे

Nagar News :

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याने कोपरगाव तालुक्यातील पाझर तलाव भरून द्यावेत या मागणीसाठी शेतकर्‍यांनी आज (शुक्रवार) कोपरगाव - संगमनेर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदाेलनामुळे कोपरगाव - संगमनेर मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली. (Maharashtra News)

all political parties from nagar opposed to release water for jayakwadi dam in presence of radhakrishna vikhe patil
Manoj Jarange Patil Sabha In Satara: जरांगे-पाटलांच्या सभेला उदयनराजेंसह शिवेंद्रराजेंचा विराेध? मराठ्यांनी स्पष्टच सांगितलं

कोपरगावच्या दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी रांजणगाव देशमुख येथे सहा शेतकर्‍यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो शेतकर्‍यांनी दोन तास रास्ता रोको आंदाेलन करत पाझर तलाव भरून देण्याची मागणी केली.

जायकवाडीला पाणी देऊ नये : सर्व पक्षीय ठराव

अहमदनगर येथे गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत नगर जिल्ह्यातील पाणी मराठवाड्याला सोडण्याबाबत सर्व पक्षातील नेत्यांनी चर्चा केली. यामध्ये सर्वच पक्षातील आमदार आणि खासदारांनी चर्चेत सहभाग नोंदवला. नगर जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता सर्वच राजकीय नेत्यांनी जायकवाडीला पाणी न देण्याचा एकमुखी निर्णय घेतला.

त्या संदर्भातला ठराव राज्य शासनाकडे तात्काळ पाठवला जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या बैठकीत भंडारदरा, निळवंडे, गोदावरी आणि मुळा धरणातील पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन निश्चित करण्यात आले. या बैठकीस खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार आशुतोष काळे, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नरेंद्र घुले, संजीवनी कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्यासह जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.


Edited By : Siddharth Latkar

all political parties from nagar opposed to release water for jayakwadi dam in presence of radhakrishna vikhe patil
Manoj Jarange Patil Sabha In Kolhapur: छत्रपतींना व्यासपीठावर स्थान द्यावे, मनाेज जरांगे पाटलांची इच्छा; जाणून घ्या काेल्हापुरातील वाहतुकीतील बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com