Manoj Jarange Patil Sabha In Satara: जरांगे-पाटलांच्या सभेला उदयनराजेंसह शिवेंद्रराजेंचा विराेध? मराठ्यांनी स्पष्टच सांगितलं

उद्याच्या सभेसाठी मराठा समन्वयक तयारी करीत आहेत.
udayanraje and shivendraraje did not opposed manoj jarange patil sabha of satara
udayanraje and shivendraraje did not opposed manoj jarange patil sabha of satarasaam tv

Satara News :

मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) प्रयत्नशिल असलेले मनोज जरांगे- पाटील (manoj jarange patil latest marathi news) यांची उद्या (शनिवार, ता. 18) साता-यात हाेणा-या सभेचे स्थळ बदलण्यात आले आहे. ही सभा पोवई नाका ऐवजी राजवाडा नजीकच्या गांधी मैदानावर हाेणार आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या शिवतीर्थ (पाेवई नाका) येथे हाेणा-या सभेला काेणाचाही विराेध नव्हता असेही मराठा समन्वयकांनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. (Maharashtra News)

udayanraje and shivendraraje did not opposed manoj jarange patil sabha of satara
Satara: आंतरराज्य टोळी जेरबंद; २७ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस,एक किलो सोन्यासह पाच किलो चांदी हस्तगत

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात केली आहे. ते आज (शुक्रवार) सांगली, कोल्हापुर (kolhapur) आणि इस्लापूर येथे दाैरा करणार आहेत. उद्या ते सातारा येथे येणार आहेत. उद्याच्या सभेसाठी मराठा समन्वयक तयारी करीत आहेत.

पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक (chhatrapati shivaji maharaj) असणाऱ्या शिवतीर्थावर मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मराठा समाजासह खासदार उदयनराजे (udayanraje bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी विरोध केला हाेता या प्रश्नावर खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह मराठा समाजातील कोणीही मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध केलेला नाही असा खूलासा मराठा समन्वयकांनी माध्यमांशी बाेलताना दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्या (शनिवार) मनाेज जरांगे पाटील हे जलमंदिर पॅलेस येथे श्री भवानी मातेचे दर्शन घेतील. त्यानंतर ते सुरुची बंगला येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांची भेट घेतील अशी माहिती मराठा समन्वयकांनी माध्यमांना दिली.

Edited By : Siddharth Latkar

udayanraje and shivendraraje did not opposed manoj jarange patil sabha of satara
Maratha Reservation: शिवतीर्थावर सभा घेतली तर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगे यांना कुणी दिला इशारा?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com