Panvel railway station during night block operations for the Kalamboli Coaching Complex project. Saam Tv
मुंबई/पुणे

प्रवाशी मित्रांनो लक्ष द्या ! हार्बर लाईनवर रविवार ते बुधवार विशेष पॉवर ब्लॉक

Central Railway Night Power Block Timings For Panvel Station: पनवेल–कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी ७ ते १७ डिसेंबर २०२५ दरम्यान मध्य रेल्वेने विशेष मध्यरात्री पॉवर ब्लॉक्स जाहीर केले आहेत.

Omkar Sonawane

मुंबईच्या हार्बर लाईनवरून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पनवेल–कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पांतर्गत अडथळे दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विशेष पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. हे ब्लॉक्स ०७/०८ डिसेंबर, ०९/१० डिसेंबर ते १४/१५ डिसेंबर आणि १६/१७ डिसेंबर २०२५ या मध्यरात्रीदरम्यान दररोज रात्री ०१.३० ते ०३.३० या वेळेत घेण्यात येतील. हा ब्लॉक पनवेल स्टेशन परिसरातील अप-डाउन मेल मार्ग, अप-डाउन कर्जत मार्ग, लूप मार्ग, इंजिन रिव्हर्सल मार्ग तसेच पनवेल स्टेशनच्या ६ आणि ७ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर लागू असेल.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पनवेल – कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स संदर्भातील अडथळे दूर करण्याच्या कामांसाठी ०७/०८.१२.२०२५ (रविवार/सोमवार मध्यरात्री), ०९/१०.१२.२०२५ (मंगळवार/बुधवार मध्यरात्री) ते १४/१५.१२.२०२५ (रविवार/सोमवार मध्यरात्री) तसेच १६/१७.१२.२०२५ (मंगळवार/बुधवार मध्यरात्री) दरम्यान दररोज रात्री ०१.३० ते ०३.३० वाजेपर्यंत विशेष पॉवर ब्लॉक्स परिचालीत करण्यात येतील.

हा ब्लॉक पनवेल स्टेशन मर्यादेत अप व डाउन मेल मार्ग, अप व डाउन कर्जत मार्ग, लूप मार्ग, इंजिन रिव्हर्सल मार्गावर तसेच पनवेल स्टेशनच्या ६ आणि ७ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मचा समावेश असेल.

मेल व एक्सप्रेस गाड्यांवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे असतील :

०७/०८.१२.२०२५ (रविवार–सोमवार मध्यरात्री)

गाडी क्रमांक 22193 दौंड– ग्वालियर एक्सप्रेस कर्जत –कल्याण–भिवंडी रोड मार्गे वळवली जाईल. गाडीला नियोजित पनवेल थांब्याऐवजी कल्याण येथे थांबा देण्यात येईल.

०९/१०.१२.२०२५ (मंगळवार – बुधवार मध्यरात्री)

गाडी क्रमांक 22149 एर्नाकुलम – पुणे एक्सप्रेस सोमाटणे येथे १ तास १५ मिनिटांसाठी नियमन (रेग्युलेट) करण्यात येईल.

दि. १०/११.१२.२०२५ (बुधवार – गुरुवार मध्यरात्री)

गाडी क्रमांक 22115 लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी एक्सप्रेस JCO ११.१२.२०२५ रोजी ०३.३० वाजता री-शेड्युल करण्यात येईल.

गाडी क्रमांक 22655 एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस सोमाटणे येथे १ तासासाठी रेग्युलेट करण्यात येईल.

दि. ११/१२.१२.२०२५ (गुरुवार – शुक्रवार मध्यरात्री)

गाडी क्रमांक 11099 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगांव एक्सप्रेस दि. १२.१२.२०२५ रोजी ०१.४५ वाजता री-शेड्युल करण्यात येईल.

गाडी क्रमांक 22114 तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस सोमाटणे येथे १ तास १५ मिनिटांसाठी रेग्युलेट करण्यात येईल.

दि. १२/१३.१२.२०२५ (शुक्रवार – शनिवार मध्यरात्री)

गाडी क्रमांक 11099 लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगांव एक्सप्रेस १३.१२.२०२५ रोजी सुटणारी, ०३.३० वाजता री-शेड्युल करण्यात येईल. गाडी क्रमांक 22149 एर्नाकुलम – पुणे एक्सप्रेस सोमाटणे येथे १ तास १५ मिनिटांसाठी रेग्युलेट करण्यात येईल.

दि. १३/१४.१२.२०२५ (शनिवार–रविवार मध्यरात्री)

गाडी क्रमांक 11099 लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगांव एक्सप्रेस JCO १४.१२.२०२५ रोजी सुटणारी ०३.३० वाजता री-शेड्युल करण्यात येईल.

गाडी क्रमांक 22653 तिरुवनंतपुरम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस सोमाटणे येथे १ तासासाठी रेग्युलेट करण्यात येईल.

दि. १४/१५.१२.२०२५ (रविवार–सोमवार मध्यरात्री)

गाडी क्रमांक 22193 दौंड – ग्वालियर एक्सप्रेस कर्जत– कल्याण – भिवंडी रोड मार्गे वळवली जाईल. गाडीला नियोजित पनवेल थांब्याऐवजी कल्याण येथे थांबा देण्यात येईल.

दि. १६/१७.१२.२०२५ (मंगळवार–बुधवार मध्यरात्री)

गाडी क्रमांक 22149 एर्नाकुलम – पुणे एक्सप्रेस सोमाटणे येथे १ तास १५ मिनिटांसाठी रेग्युलेट करण्यात येईल.

गाडी क्रमांक 12134 मंगळूरू जंक्शन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस खालीलप्रमाणे रेग्युलेट केली जाईल :

दि. ०७/०८.१२.२०२५ रोजी सोमाटणे येथे ३० मिनिटांसाठी

दि. ०९/१०.१२.२०२५ ते १३/१४.१२.२०२५ पर्यंत आपटा येथे २० मिनिटांसाठी आणि १६/१७.१२.२०२५ रोजी ३० मिनिटांसाठी.

प्रवाशांनी गाड्यांच्या चालण्यात झालेल्या बदलांची नोंद घ्यावी आणि होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाडकडून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंडिगोची धडाधड उड्डाणं रद्द; कधीपर्यंत पूर्ववत होईल इंडिगोची सेवा,सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

शिक्षकांचा एल्गार, 80 हजार शाळांना कुलूप, शिक्षकांनी का पुकारला बंद?

वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेसेना–भाजप राडा! कामगार युनियनवरून वाद चिघळला

अंधारात मोबाईलवर बोलणं आलं अंगलट, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

Maharashtra Politics: महापालिकेला कोणतेही गणितं करू नका; भाजपच्या दादांचा राष्ट्रवादीला सूचक सल्ला

SCROLL FOR NEXT