BJP Vs Shiv sena: बोर्ड फाडले, एकमेकांना घातल्या लाथा; वरळीत भाजप-ठाकरे सेनेत का झाला राडा?

BJP vs UBT Shiv Sena Clash: मुंबईतील वरळी येथे कामगार संघटनेच्या वादावरून भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. काही दिवसांपूर्वी ताज लँड्स एंड येथे अशाच प्रकारची घटना घडली होती.
BJP vs UBT Shiv Sena Clash:
Bjp–shiv Sena Clash In Worli Over Workers Union Disputesaamtv
Published On
Summary
  • BJP आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांत कामगार युनियनवरून तुफान राडा

  • कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्या मारहाण केली

  • यापूर्वीही ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांचे नेते आमने-सामने आले

मुंबईतील वरळीत भाजपविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तुफान राडा झाला. वरळीतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तिथले पक्षांचे कामगार युनियनचे बोर्ड फाडले. एकमेकांना लाथाबुक्क्या घातल्या. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते का भिडले? त्याचे कारण होते, कामगार युनियन.

कामगार युनियनवरून दोन्ही पक्षातील कार्यकर्ते भिडले. भाजप नियमबाह्यरित्या संघटनेची नोंद करत असल्याचा आरोप करत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी कामगार युनियनचे बोर्ड फाडून टाकलं . पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूंच्या आक्रमक कार्यकर्त्यांवर ताबा मिळवला. दरम्यान काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्येही भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असाच राडा झाला होता.

BJP vs UBT Shiv Sena Clash:
Nanded: २८०० मतदार ओळखपत्रांचा पत्ता कोचिंग क्लासेस अन् कॉलेज, निवडणूक विभागाचा अजब कारभार

ठाकरे सेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना भाजप प्रणित अखिल भारतीय कर्मचारी संघटनेत सहभागी होण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाकडून दबाव टाकला जात असल्याचा दावा ठाकरे पक्षाने केला होता. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केले होते. आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते.

त्यानंतर अशाच प्रकारे सेंट रेजिस हॉटेलमध्येही याच कारणावरून राडा झाल्याची माहिती मिळतेय. मुंबईमधील अनेक पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित भारतीय कामगार सेना कार्यरत आहे. या कामगार सेनेवर भाजपनं आपलं लक्ष केंद्रित केलंय. तर काही दिवसांपूर्वी भाजप प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेची स्थापना झालीय. या संघटनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित संघटनेतील कामगारांची दिशाभूल करत त्यांच्या सह्या घेऊन संघटनेत सहभागी होण्याबाबत हॉटेल प्रशासनाकडून दबाव येतो, असा आरोप होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com