Indigo Flight : घोळात घोळ! जायचं होतं पुण्याला पोचले मात्र हैद्राबादला! इंडिगोच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका

Nagpur Indigo Flight Cancelled : नागपूर विमानतळावर इंडिगोच्या उड्डाणांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पायलट कमतरतेमुळे अनेक फ्लाईट्स रद्द किंवा पुढे ढकलल्या गेल्या असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Indigo Flight : घोळात घोळ! जायचं होतं पुण्याला पोचले मात्र हैद्राबादला! इंडिगोच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका
Nagpur NewsSaam tv
Published On
Summary
  • नागपूर विमानतळावर इंडिगोच्या उड्डाणांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठा गोंधळ

  • ५५०हून अधिक उड्डाणे रद्द किंवा विलंबित; प्रवाशांचा तीव्र संताप

  • लगेज गायब आणि चुकीच्या शहरात लँड केल्याने त्रस्त प्रवासी

  • इंडिगो व्यवस्थापनावर उपाययोजनांचा दबाव वाढला

गेले दोन दिवस इंडिगो विमान कंपनीला पायलटच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या दोन दिवसांत अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याचा फटका परदेशात जाणाऱ्या बऱ्याच पर्यटकांना बसला आहे. काहींचं लगेज मिळालं नाही, काहींचा लग्न सोहळ्याचा मुहूर्त हुकला; तर काहींना पुण्याला जायचं होत त्यांना हैद्राबादला सोडलं असल्याची संतप्त घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर विमानतळ येथे अनेक प्रवासी वेळेवर विमान पकडण्यासाठी पोहचले. मात्र याठिकाणी आल्यावर विमान रद्द किंवा पुढे ढकलली असल्याचे सांगण्यात आल्याने प्रवाश्यांना मोठ्या मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता पर्यंत देशातील ५५० इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. काही प्रवासी बाहेरील देशातून भारतात आले. मात्र त्यांच लगेज अजूनही भारतात पोहचले नाही.

Indigo Flight : घोळात घोळ! जायचं होतं पुण्याला पोचले मात्र हैद्राबादला! इंडिगोच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका
School Student : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पुण्यात कडाक्याची थंडी, शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

ऑस्ट्रेलियातून एक कुटुंब आले होते. त्यांना दिल्लीमध्ये लगेज मिळण्याऐवजी त्यांना नागपूरला जाणार सांगितलं. त्यानुसार ते नागपूरला आले. मात्र नागपूरला आल्यावर लगेज मात्र कुठे आहे, याची कुठलीही माहिती त्यांना देण्यात आली नाही. याचा मोठा फटका या कुटुंबाला बसला. आलेल्या अनुभवातून विमानतळावरील संतप्त झालेल्या एका तरुणाने म्हटले की, यानंतर इंडिगो मध्ये प्रवास करणार नाही.

Indigo Flight : घोळात घोळ! जायचं होतं पुण्याला पोचले मात्र हैद्राबादला! इंडिगोच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका
Pune : पुणे-नाशिक महामार्गावर गुंडांची दहशत, रस्ता अडवून एसटी चालकाला मारहाण, धक्कादायक VIDEO व्हायरल

तसेच काल रात्री ११ वाजून ४० मिनिटांना नागपूर ते पुणे अशी इंडिगोच्या फ्लाईटचे नियोजन होते. मात्र ती फ्लाईट एक वाजेपर्यंत नागपूर मधून रवाना झाली नाही. पहाटे एक नंतर उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात आपल्या विमानाला पुण्यात लँड होण्याची परवानगी मिळत नाही, त्या ठिकाणी लँड होण्यासाठी जागा नाही, असं कारण सांगून इंडिगो crew आणि व्यवस्थापनाने फ्लाईट पुण्या ऐवजी हैदराबादला लँड केली. दरम्यान प्रवाशांना पुण्याऐवजी हैद्राबादला सोडल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी विमानतळाच्या आतील भागात एकच गोंधळ घातला. संतप्त झालेल्या प्रवाशांनी यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com