panhala killa  Saam tv
मुंबई/पुणे

Panhala Fort : धन्य तो राजा अन् धन्य ते मावळे; विद्यार्थ्यांनी हुबेहूब साकारला पावनखिंडच्या युद्धाचा देखावा; PHOTO पाहाच

Panhala pawankhind : पनवेलमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पावनखिंडचा देखावा साकारला आहे. या पावनखिंड युद्ध देखाव्याचे फोटो पाहून अभिमान वाटेल.

Vishal Gangurde

panhala fort : दिवाळीची तयारी सगळीकडेच जोमाने सुरू आहे. फराळ, कंदील, रांगोळी या सोबत दिवाळी किल्ल्यांची सुद्धा तयारी मुंबई आणि नवी मुंबईत पहायला मिळत आहे. पनवेलच्या पिल्लई कॉलेजमध्ये असंच काही चित्र पाहायला मिळत आहे.

panhala

या दिवाळी किल्ल्यात ३ विशेष आकर्षण आहेत. पन्हाळगड, सिद्धी जोहरची छावणी आणि घोडखिंडीतल्या युद्धाचा देखावा आहे. या दिवाळी किल्ल्यात पन्हाळगडावरील अंबरखाना, अंधारबाव, दुतोंडी बुरुज, काली बुरुज, तीन दरवाजा, सोमेश्वर तलाव, तटबंदी व इतर वास्तू पाहायला मिळते.

panhala fort

छत्रपती शिवराय आणि पन्हाळगडाशी संबंधित ऐतिहासिक घटना म्हणजे सिद्धी जोहरचा वेढा. त्या घटनेचा अनुभव या दिवाळी किल्ल्यातही पहायला मिळतो. गोणपाटाच्या रुमालांना तंबूचा आकार देऊन आणि चुना रंगवून, विद्यार्थ्यांनी सिद्धी जोहरची छावणी पन्हाळ्याभोवती रचली आहे.

panhala killa information

या दिवाळी किल्ल्याच्या दुसऱ्याच बाजूला घोडखिंड साकारून त्यात दांडपट्टा चालवणारे बाजीप्रभू देशपांडे आणि रक्तरंजित झालेल्या मराठे मावळे आणि सिद्धी जोहरच्या आदिलशाही फौजेचा देखावा पाहायला मिळतो. या देखाव्यात गोफण, फेकीचे दगड, दोरखंड अश्या इतर युद्धकलेतील गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात.

pawankhind

विद्यार्थी काय म्हणाले?

जमवलेले रंग, गोणपाट, जुन्या असाइन्मेंटचे गट्ठे, पुट्ठे व इतर टाकाऊ गोष्टींपासून हा दिवाळी किल्ला साकारताना विद्यार्थ्यांना खूप मजा आली. मराठी वाङ्मय मंडळाच्या विद्यार्थ्यांनी या दिवाळी किल्ल्यात फक्त जीव नाही फुंकलाय, तर त्यातून पराक्रमाची गोष्टही मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाची उजळणी आणि मराठी संस्कृती साजरा करणे हा यामागील उद्देश, असं या मंडळाचे विद्यार्थी सांगतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra New DGP : संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक

Car Driving Tips: कार चावलताना वारंवार झोप येतेय? तर 'या' टिप्स ट्राय करा....

Prajakta Mali: कामातून वेळ काढून तुझ्याकडे येईलच, प्राजक्तानं कुणाला केलं प्रॉमिस?

Sanjay Raut News : लाडकी बहीण योजनेवरून शिंदे - राऊतांमध्ये वार पलटवार, पाहा Video

Beed Vidhan Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिकिटासाठी शब्द दिला मात्र पूर्ण केला नाही; अनिल जगताप यांनी व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT