Pune BJP News.jpg 
मुंबई/पुणे

Pune : ऑपरेशन लोटसमुळे पुण्यात भूकंप अन् विरोधकांना हादरे, पूर्व अन् पश्चिमेत भाजपकडून करेक्ट कार्यक्रम

BJP induction before Pune municipal elections : पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने ऑपरेशन लोटस यशस्वी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का दिला असून अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Akshay Badve

Operation Lotus impact on Pune politics : "महापालिका निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा हा भाजपच्या वाटेवर", अशा चर्चा राजकीय पटलावर सुरूच होत्या आणि अखेर भाजप ने करून दाखवलं. पुण्यातील वडगाव शेरी चे विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी आज भाजप मध्ये प्रवेश केला. इतकचं नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून २ वेळा विधानसभा निवडणूक लढविलेल्या सचिन दोडके यांनी सुद्धा आज हाती कमळ घेतलं.

अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपलेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार झटका दिला आहे. आज मुंबईत झालेल्या भाजप पक्ष प्रवेशावेळी पठारे, दोडके यांच्यासह अनेकांनी हाती कमळ घेतलं. सायली वांजळे, विकास दांगट सारख्या अनेक जणांचे भाजप प्रवेश आज मुंबईत झाले.

"मिशन पालिकेसाठी" सुरेंद्र पठारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

बापू पठारे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत पण त्यांच्या मुलाने हाती कमळ घेतले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामागे अनेक राजकीय समीकरणे आहेत. पुणे महापालिकेत १२० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा मानस आहे आणि त्यामुळे आजच्या प्रवेशामुळे भाजपची आणखी ताकद वाढली आहे.

सुरेंद्र पठारे यांच्या पक्षप्रवेशामुळे पुण्यातील ‘टीम देवेंद्र’ अधिक मजबूत झाली असल्याचे चित्र आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टीचे आणि विकासाभिमुख नेते म्हणून ओळखले जातात. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच त्यांनी पुण्यात तब्बल ३००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. यावेळी त्यांनी पुणे हे केवळ सांस्कृतिकच नव्हे तर टेक्नोसेवी शहर असून, आगामी काळात जागतिक पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करण्याची पुण्याची क्षमता अधोरेखित केली होती. बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी पुण्यातील नामांकित अशा सीईओपी महाविद्यालयातून त्यांनी इंजिनियरिंग ची पदवी प्राप्त केली असून त्यांनी महाविद्यालयांकडून सुवर्ण पदक सुद्धा मिळवलं आहे.

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांचा विजय झाला होता. त्यांच्या या विजयात सुरेंद्र पठारे यांचा मोलाचा वाटा राहिला. संघटनात्मक क्षमता, नियोजनशक्ती आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जमिनीवर काम करण्याची हातोटी स्पष्टपणे दिसून आली होती.

पुणे महापालिकेत समाविष्ट गावांमुळे विमानननगर -लोहगाव-वाघोली असा नव्याने प्रभाग झाला आहे. या प्रभागात पुन्हा कमळ फुलविण्यासाठी भाजप ने सुरेंद्र पठारे त्यांच्या पक्षात घेतलं हे नक्की. या प्रभागाची लोकसंख्या ९२ हजार ४१० इतकी आहे. यात विमाननगर, सोमनाथनगरचा ३० टक्के, लोहगाव ४० टक्के आणि वाघोलीचा ३० टक्के भाग आहे. महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत या भागातून भाजपचे सर्वच्या सर्व चार नगरसेवक विजयी झाले होते. आता पुन्हा एकदा हा प्रभाग तसेच पूर्व भागाकडे भाजप चे वर्चस्व राहावं म्हणून सुरेंद्र चा प्रवेश झाला आहे असं जाणकार सांगतात.

सचिन दोडके यांचे आमदारकीचे स्वप्न आता तरी पूर्ण होणार?

काही दिवसांपूर्वी पुण्यातील वारजे भागात सचिन दोडके यांचे फ्लेक्स लागले होते. "मी येतोय जनतेच्या आग्रहासाठी खडकवासल्याच्या जनतेच्या सेवेसाठी" अशा मजकुराचे ज्यावर सचिन दोडके यांचे फ्लेक्स पाहायला मिळाले. "हे फ्लेक्स कोणी लावले ते मला माहिती नाही. भाजप प्रवेशाबद्दल केलेल्या चर्चा "निरर्थक" आहेत, अशी प्रतिक्रिया सचिन दोडके यांनी दिली होती. असं असलं तरी सुद्धा ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असे भाकीत पुण्यातील अनेक नेते मंडळींनी केलं होतं.

सचिन दोडके हे पुणे शहरातील वारजे भागातील नगरसेवक राहिले आहेत. महापालिकेचा चांगला अनुभव त्यांच्याकडे असून वारजे परिसरात सुद्धा त्यांचं चांगलं "नाव" आहे. दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यानंतर सुद्धा दोडके यांनी शरद पवारांची साथ देणे पसंत केलं आणि २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

खडकवासला मतदारसंघात 2009 पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे त्यापाठोपाठ शिवसेनेची सत्ता होती पण गेल्या ४ "टर्म" पासून इथे भाजपकडून भीमराव तापकीर यांनी झेंडा रोवला आहे. याच मतदारसंघातून, सचिन दोडके यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी ने दोन वेळा आमदारकीचे तिकीट दिलं होतं. सचिन दोडके यांची २०१९ ला २५९५ मतांनी आमदारकी गेली २०२४ मध्ये खडकवासला मतदारसंघात सचिन दोडके (राष्ट्रवादी - शरद पवार), भीमराव तापकीर (भाजप), मयुरेश वांजळे (मनसे) अशी तिरंगी लढत झाली पण यावेळी सुद्धा भीमराव तापकीर यांनी निवडणूक जिंकत सलग चौथ्यांदा आमदार पद मिळवलं आणि पुन्हा एकदा दोडके यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. पुण्याचा पश्चिम भाग मोठ्या प्रमाणावर विस्तारित झाला आहे. एका बाजूला, बाणेर, पाषाण सारखा भाग आहे तर दुसऱ्या बाजूला, वारजे, खडकवासला असे भाग आहेत. पश्चिम भागात भाजपची ताकद वाढवण्यासाठी तसेच "लाँग टर्म" विचार केला तर २०२९ मध्ये नवीन चेहरा देण्यासाठी सचिन दोडके यांना हा प्रवेश दिला असावा अशी शक्यता नाकारता येत नाही. त्याप्रमाणे, आता तरी आमदारकी मिळेल आणि ते ही भाजपकडून असे स्वप्न दोडके यांचे पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

शहरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असणारे बापू पठारे हे यापूर्वी भाजप मध्ये होते. त्यांची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक आहेच तर दुसरीकडे पठारे हे वेळोवेळी अजित पवारांच्या मंचावर सुद्धा दिसून येतात. त्यामुळे महायुतीमध्ये सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा या गुणाचा पठारे पिता पुत्रांना पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीसाठी फायदा होईल असं दिसतं. दुसऱ्या बाजूला, सचिन दोडके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी चे सच्चे कार्यकर्ते मानले जात होते. खडकवासला विधानसभा तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात सचिन दोडके यांनी तुतारी ठिकठिकाणी पोहचवली होती. मात्र गेल्या २ वर्षांपासून आमदार न होता आल्यामुळे की काय आता तरी खडकवासल्याचे आमदार पद या आशेने त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला असावा अशी चर्चा जोरदार सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Land Satbara: सामूहिक सातबारा उताऱ्यातून स्वतंत्र उतारा कसा काढायचा? कसा कराल अर्ज?

Success Story : जव्हारमधील शेतकऱ्याची गगन भरारी! दोन एकर शेतीतून तरुण बनला लखपती

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी हॉटेलस्टाईल कुरकुरीत जलेबी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये निकालाचा एक दिवस अगोदर तळोदा शहरात जादूटोणा

महिलेला बोगस मतदान करताना पकडलं अन्...; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT