Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, इंजिन अन् ५ डब्बे रूळावरून घसरले

Rajdhani Express hits elephant herd in Assam : आसामच्या होजाई जिल्ह्यात राजधानी एक्सप्रेसला हत्तींच्या कळपाची धडक बसली. त्यामुळे इंजिनसह पाच डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत आठ हत्तींचा मृत्यू झाला आहे.
Rajdhani Express hits elephant herd in Assam
Rajdhani Express hits elephant herd in Assam
Published On

Rajdhani Express Train Accident in Assam: आसामच्या होजाईमध्ये शनिवारी मध्यरात्री राजधानी एक्सप्रेसचा भयंकर अपघात झाला. हत्तींच्या कळपाने राजधानी एक्सप्रेसला जोरात धडक दिल्यामुळे इंजिन आणि ५ डब्बे रूळावरून खाली घसरले. या दुर्घटनेत ८ जंगली हत्तींचा मृत्यू झाला तर एक हत्ती गंभीर जखमी झाला आहे. येथील वन विभागाच्या अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सैरांग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस ट्रेनला शनिवारी मध्यरात्री २.१७ वाजता जंगली हत्तीच्या कळपाने जोरात धडक दिली. या दुर्घटनेत ८ हत्तींचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की अनेक रेल्वे डबे रुळावरून घसरले. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजतेय. घटनास्थळावर तात्काळ मदतकार्य करण्यात येत आहे.

Rajdhani Express hits elephant herd in Assam
Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

जमुनामुख-कामपूर विभागातील चांगजुराई परिसरात शनिवारी २:१७ वाजता हत्तीच्या कळपाने धडक दिल्याची घटना घडली. सुदैवाने ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही. काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. नागाव विभागीय वन अधिकारी सुहास कदम यांनी सांगितले की, वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे आणि परिस्थितीचा आढावा घेत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कळपात आठ ते दहा हत्ती होते. त्यामधील ८ हत्तीचा मृत्यू झालाय, तर एक जखमी आहे.

Rajdhani Express hits elephant herd in Assam
Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

आसाम नेमकं झाले काय ?

सैरांग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस ट्रेन चांगजुराई परिसरात २ वाजण्याच्या आसपास पोहचली. त्यावेळी लोको पायलटला रूळावर हत्तीचा कळप दिसला. रेल्वे लोको पायलटने रुळांवर हत्तींना पाहिल्यानंतर आपत्कालीन ब्रेक लावले. पण हत्तीच्या कळपाने ट्रेनला जोरात धडक दिल्याने ही दुर्घटना घडली, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. हे ठिकाण हत्तींसाठी नियुक्त केलेले कॉरिडॉर मानले जात नाही.

या अपघातानंतर बाधित भागातून जाणाऱ्या गाड्या अप लाईनवर वळवण्यात आल्या. दुर्घटनेच्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रुळांवर हत्तीचे अवशेष विखुरल्यामुळे अप्पर आसाम आणि ईशान्येकडील इतर भागात रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे.

Rajdhani Express hits elephant herd in Assam
Kalyan Traffic : कल्याण पूर्व-पश्चिमला जोडणारा उड्डाणपूल बंद, २० दिवसांसाठी पर्यायी मार्ग, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com