

BJP Operation Lotus success in Pune : पुण्यात भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी झालंय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेस-ठाकरेसेनेला जोरदार धक्का दिलाय. भाजने दिग्गजांना आपल्या पक्षात घेत ऑपरेशन लोटस यशस्वी केलंय. एक दोन नव्हे तर तब्बल २२ जण भाजपमध्ये आज प्रवेश करणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र, त्या वेळ अमावस्य असल्याने हे प्रवेश दोन दिवस पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे प्रवेशासाठी आजचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. (Senior leaders from NCP, Congress and Shiv Sena join BJP)
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा विश्वासू अन् निकटवर्तीय फोडला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हा सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसलाय. खासदार मुरलीधर मोहोळ यांची शिष्टाई कामी आली आहे.
सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय सचिन दोडके यांनी आज भाजपात प्रवेश केला. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले सचिन दोडके यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला.
पुण्यात भाजपचे "मिशन महापालिका"
महापालिका निवडणुकीचा पार्श्वभूमीवर भाजपात आज "मेगा प्रवेश" झाला. मुंबईत झालेल्या पक्ष प्रवेशात अनेक मोठी नावं आहेत. पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव आमदार यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सायली वांजळे यांनी भाजपमध्ये केला आहे.
आज पुण्यातील कुणीकुणी भाजपमध्ये प्रवेश केला?
सुरेंद्र पठारे (शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)
सायली वांजळे (अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)
बाळा धनकवडे (शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)
नारायण गलांडे (अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)
विकास दांगट (अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)
रोहिणी चिमटे (शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)
सतिश लोंढे
खंडू लोंढे
प्रतिभा चोरगे
पायल तुपे
सचिन दोडके
शुभांगी किरण होले (शिवरकर)
सुदर्शन उर्फ बाबा बाळासाहेब शिवरकर
संजोग वाघेरे, शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख
राहुल कलाटे, (शरद पवार गट)
अमित गावडे, (माजी नगरसेवक शिवसेना)
राजू मिसाळ, (माजी नगरसेवक ncp)
प्रशांत शितोळे, (माजी नगरसेवक ncp)
रवी लांडगे, माजी नगरसेवक
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.