Nilesh Ghaiwal  Saam tv
मुंबई/पुणे

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Nilesh Ghaiwal News : गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या भावाविरोधात गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यानंतर त्याच्या शिक्षक भावाला नोकरीवरून काढण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर एकूण १० गुन्हे दाखल

घायवळच्या भावावरही गुन्हे दाखल

घायवळवर खंडणी, MOCCA, गोळीबार, फसवणूक असे गंभीर गुन्हे

पोलिसांनी या गुन्हेगारी टोळीविरोधात मोठी मोहीम सुरू

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला पळाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. गुंड निलेशवर एकापाठोपाठ गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे त्याच्या भावाच्या विरोधातही पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. त्याच्या भावाविरोधातही ३ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गंभीर गुन्ह्यामुळे गुंड निलेश घायवळच्या भावाची नोकरीवरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सचिन घायवळ असे गुंड निलेश घायवळच्या भावाचे नाव आहे. सचिन घायवळ हा व्हॉली बॉल कोच म्हणून पुण्यातील कर्वे नगरमधील मीलेनीयम शाळेमध्ये काम करत होता‌. सचिन घायवळवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मीलेनीयम शाळेने सचिन घायवळला नोकरीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे पोलिसांना सचिन घायवळ अजूनही सापडला नाही. पुणे पोलिस शोध घेत आहे. सचिन घायवळ याच्यावर ही तीन गुन्हे दाखल आहेत. खंडणी गोळीबार आणि मोक्का असे गुन्हे दाखल आहेत. याबाबत पुणे पोलीस तपास करत आहे.

गुंड निलेश घायवळवर १० गुन्हे दाखल

निलेश घायवळवर काल रात्री उशिरा एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलांना भाजीपाला, दूध अंडी पुरवणारी ही कंपनीतीला धमकावत खंडणी मागितली होती. 2024 आणि 2025 मध्ये एका कंपनीकडून 45 लाख रुपयांची खंडणी उकळली होती.

निलेश घायवळ याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहे. गुंड घायवळच्या विरोधात 8 गुन्हे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहेत. तर वारजे आणि सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल आहे. तर एक मोक्याचा गुन्हा देखील निलेश घायवळ याच्यावर दाखल आहे.

निलेश घायवळ याच्यावर दाखल असलेले एकूण १० गुन्हे

१) कोथरूड गोळीबार प्रकरण

२) कोयत्याने हल्ला केल्या प्रकरणी

३) घरावर छापेमारी करण्यात आली त्यावेळी घायवळ याच्या घरी जिवंत काडतुसे सापडले होते

४) बनावट नंबर प्लेट

५) पासपोर्ट बनवण्यासाठी खोटी कागदपत्रे दिली

६) निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांनी १० फ्लॅट नावावर करून घेत खंडणी मागितली

७) सिम कार्ड दुसऱ्याच्या नावाने वापरले

८) गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रील्स बनवल्या प्रकरणी

९) मुसा गांजा तस्करी प्रकरण

१०) एका कंपनीकडून ४५ लाख रुपयांची खंडणी वसूली प्रकरणी , मिलेनियम शाळेत कॅन्टीन चालवण्यासाठी खंडणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळ्यात 8.0°c तापमानाची नोंद

Cyber Crime : महापालिकेच्या नावाने सायबर फसवणूक! फक्त १० रुपये भरताच बँक खात्यातून उडाले लाखो रुपये

Manoj Jarange : जरागेंच्या हत्येचा कट, धनंजय मुंडेंच्या कट्टर समर्थकाला बेड्या, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

8th Pay Commission: ६९ लाख पेन्शनधारकांना झटका! मिळणार नाही आठव्या वेतन आयोगाचा लाभ? वाचा सविस्तर

Gajar Halwa Recipe : ना साखर, ना खवा; 10 मिनिटांत बनवा गाजर हलवा, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT