मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

Manoj Jarange News : ओबीसी मेळाव्यानंतर मनोज जरांगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी मनोज जरांगे यांनी मुंडे आणि भुजबळांवर टीका केली.
Manoj Jarange on Dhanajay Munde
Manoj Jarange Saam tv
Published On
Summary

ओबीसी मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका

जरांगेंनी जालन्यातून पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंना खुलं आव्हान

पंतप्रधानांच्या आईबाबत मुंडे यांनी पूर्वी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत, रेकॉर्डिंग असल्याचा इशारा जरांगेंनी दिला.

अक्षय शिंदे, साम टीव्ही

बीडमध्ये ओबीसी समाजाचा जंगी मेळावा पार पडला. या मेळाव्यात ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. धनंजय मुंडे ते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण जीआरवरून मनोज जरांगेंवर तोफ डागली. धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीचाही समाचार घेतला. त्यांनी मनोज जरांगे यांच्यावरही कठोर भाष्य केलं. मुंडे यांच्या टीकेनंतर मनोज जरांगे यांनी थेट आव्हान दिलं आहे.

ओबीसी मेळावा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले, 'संपलेल्यावर बोलू नये. आम्ही सुद्धा बसू. तेव्हा भूमिका मांडू. मी मुख्यमंत्री यांच्या आईवर बोललो नाही. तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला होता, ते काढून दाखवू का? त्याची जुनी रेकॉर्डिंग आहे'.

Manoj Jarange on Dhanajay Munde
Railway Station Update : मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नामांतर; नावात काय केला बदल? जाणून घ्या

'फडणवीस त्यांना विसरले का? तू माझ्या नादाला लागू नको. तुमच्यावर बोललो आहे. मी तुमच्या घराण्यावर नाही. तुम्ही मराठ्यांचे खून करता म्हणून तुमच्यावर बोललो आहे. याचीच बायको माझ्याकडे साथ द्या म्हणायला आली होती. 4 दिवस झाले, त्या येऊन गेल्या, पण कौटुंबीक प्रकरण असल्याने मी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. बाईच्या आडून मी वार करत नाही, असेही ते म्हणाले.

Manoj Jarange on Dhanajay Munde
Bihar Politics : महाठग, NDAची हवा, ५ किंगमेकर नेते; महाराष्ट्राचे CM फडणवीस बिहारमध्ये प्रचाराला, सांगितलं बेरजेचं राजकारण

विजय वडेट्टीवार यांच्यावर भाष्य करताना जरांगे म्हणाले,वडेट्टीवार यांनी पहिल्या भूमिकेवर यावे. भुजबळ राजकीय स्वार्थासाठी त्यांचा वापर करत आहे. धनंजय मंडेंना माहीत नाही, भुजबळ कधी गेम करून जाईल. भुजबळांना माहीत आहे की ते संपल्यात जमा आहे. त्यामुळे ओबीसींचं नेतृत्व धनगर समाजाकडे जाण्याची शक्यता आहे. गृहमंत्रालयाने भुजबळ यांचा जामीन रद्द करावा. आमच्यात दहशत पसरवत आहे,असे भुजबळ पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com