one month old baby abandoned in Mumbai  
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत मानवतेला काळिमा! १ महिन्याचे बालक कचऱ्यात फेकले; समाजाला हादरवणारी घटना

one month old baby abandoned in Mumbai : मुंबईतील अंधेरी-वर्सोवा परिसरात एक महिन्याच्या बालिकेला कचऱ्यात टाकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी, साम टीव्ही

shocking child abandonment case in Mumbai news: मुंबईतील अंधेरी-वर्सोवा परिसरात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एक महिन्याच्या बालिकेला कचऱ्यात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली. चाचा नेहरू गार्डनजवळील लष्करिया बिल्डिंगच्या मागे रस्त्याच्या वॉल कंपाऊंडजवळ कचऱ्यात मुलीला फेकलं अन् संबंधित व्यक्तीने पळ काढल्याची धक्कादायक बाब समोर आली. पालकांनी किंवा मुलाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने हेतुपुरस्सर परित्याग केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Mumbai police investigation infant rescue)

ही घटना 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.10 ते 11.10 या दरम्यान घडली असून फिर्यादी दीपक सांडू चव्हाण (Hc/33820) यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कलम 93 नुसार पोलिसांनी तात्काळ याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकारी प्रवीण ठोंबरे या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांच्याकडून आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत.

निर्दोष, निष्पाप बालिकेला कचऱ्यात फेकून देण्याचा हा अमानुष प्रकार उघड होताच अंधेरी आणि परिसरात संतापाची लाट उसळली आहे. समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? याचा प्रश्न हा प्रकार प्रत्येकाच्या मनाला पिळ लावणारा आहे. अशा क्रूर कृत्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला असून बालकाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. समाजाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेने पुन्हा एकदा मानवी संवेदनांची शोकांतिका समोर आणली आहे. मुंबईसारख्या शहरात अशी घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांकडून या गंभीर घटनेचा तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT