Pune Crime : पुण्यात शिक्षक झाला हैवान! एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली मुलीला बोलवलं अन् अत्याचार केला

Pimpri Chinchwad assault case : पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये अतिरीक्त क्लासच्या नावाखाली १७ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर आरोपीवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
crime
crime
Published On

गोपाळ मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

Pune teacher assault case extra class news : पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ४० वर्षांच्या शिक्षकाने १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केलाचा आरोप कऱण्यात आला आहे. एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली मुलीला बोलवलं अन् विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपीने मुलीला धमकावत अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये उच्च शिक्षणाच्या पूर्वपरीक्षा क्लासेसमध्ये चेतन चव्हाण नावाच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपी चेतन चव्हाण या शिक्षकाने दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केला. मुलींना जादा क्लासेसच्या नावाखाली बोलावले. त्यानंतर, एका मैत्रिणीला दुसऱ्या विषयाचा पेपर सोडवण्यासाठी चौथ्या मजल्यावर पाठवले. दुसऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लिफ्टमध्ये नेऊन विनयभंग केला.

crime
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज, बँक खात्यावर आजपासून ₹१५०० खटाखट जमा होणार, बॅलेन्स चेक करा

शिक्षकाच्या या भयानक कृत्याला पीडित मुलीने विरोध दर्शविला. पण आरोपीने तिला डोळे मोठे करून दम दिला आणि पुन्हा एकदा लिफ्टमधून खाली येताना विनयभंग केला. आरोपी मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने तिच्या मागे लागला, मात्र मुलीने मावशीकडे जायचे असल्याचे सांगून आपली सुटका करून घेतली. घरी पोहोचल्यावर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर, वडिलांनी आणि मुलीने निगडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निगडी पोलिसांनी आरोपी चेतन चव्हाण याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

crime
Cyclone Alert : पुन्हा आस्मानी संकट! 'मोंथा'नंतर आणखी एका चक्रीवादळाचं सावट, महाराष्ट्रावर होणार परिणाम, IMD चा गंभीर इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com