Neral Matheran Train : शिट्टीचा आवाज घुमणार! माथेरानला बिंदास्त फिरायला जा, ‘हिल क्वीन’ गुरूवारपासून धावणार

Neral–Matheran Toy Train News Update : मे महिन्यात दरडी कोसळल्यानंतर बंद झालेली नेरळ–माथेरान टॉय ट्रेन ६ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू. ‘हिल क्वीन’ आता विस्टाडोम कोचसह धावणार. वेळापत्रक जाणा आणि तुमचा ट्रिप प्लॅन करा!
Matheran Mini Train
Matheran Mini TrainSaam Tv
Published On

विकास मिरगणे, साम टीव्ही प्रतिनिधी

Central Railway To Resume Neral–Matheran Toy Train Services From November 6; Check Timings : मे २०२५ पासून बंद असलेली नेरळ–माथेरान मिनी ट्रेन तब्बल सात महिन्यांनंतर पुन्हा पर्यटकांच्या सेवेत धावणार आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभागाने ६ नोव्हेंबरपासून सेवा सुरू करण्याचे अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.पहिली गाडी सकाळी ८.५० वाजता नेरळहून सुटून ११.३० वाजता माथेरानला पोहोचेल, तर दुसरी गाडी १०.२५ वाजता सुटेल ती दुपारी 1 वाजून पाच मिनिटे पोहचेल. माथेरानहून परतीच्या गाड्या अनुक्रमे दुपारी २.४५ वाजता आणि ४ वाजता सुटतील आणि आपल्या वेळेत पोहोचतील. पहिल्या गाडीत विशेष विस्टाडोम कोच लावण्यात आला असून, पर्यटकांना डोंगरदर्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद चोहोबाजूने न्याहाळता येणार आहे. (Neral Matheran toy train new schedule 2025)

मे महिन्यात दरडी कोसळल्याने सेवा बंद होती. सप्टेंबरपासून रेल्वे विभागाने दुरुस्ती पूर्ण करून मार्ग पुन्हा सुरळीत केला आहे. या निर्णयाने पर्यटक आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. माथेरानच्या दऱ्यांमधून पुन्हा एकदा ‘हिल क्वीन’चा शिट्टीचा आवाज घुमणार असून पर्यटकांना ही आवडती ट्रेन निसर्गाचा आनंद देणार आहे.

Matheran Mini Train
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज, बँक खात्यावर आजपासून ₹१५०० खटाखट जमा होणार, बॅलेन्स चेक करा

दरम्यान, व्यापारी वर्गासाठीही दिलासादायक बातमी आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत मालवाहतूक करणारी विशेष मिनी ट्रेन सेवा नेरळ–माथेरान मार्गावर सकाळी ७ वाजता सुटेल, तर माथेरानहून परतीची ट्रेन दुपारी १२.२५ वाजता सुटणार आहे. वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल..

Matheran Mini Train
Cabinet Decisions : निवडणुकीआधी सरकारचा धमाका, मंत्रिमंडळाच्या बैठकीत २१ मोठे निर्णय

(अ) नेरळ – माथेरान – नेरळ ट्रेन सेवा :– Neral to Matheran toy train fare and timings

नेरळ–माथेरान डाउन गाड्या

१. ट्रेन क्रमांक 52103 नेरळ येथून ०८.५० वाजता सुटेल आणि माथेरान येथे ११.३० वाजता पोहोचेल (दैनिक)

२. ट्रेन क्रमांक 52105 नेरळ येथून १०.२५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे १३.०५ वाजता पोहोचेल (दैनिक)

माथेरान – नेरळ अप गाड्या

१. गाडी क्रमांक 52104 माथेरान येथून १४.४५ वाजता सुटेल आणि नेरळ येथे १७.३० वाजता पोहोचेल (दैनिक)

२. गाडी क्रमांक 52106 माथेरान येथून १६.०० वाजता सुटेल आणि नेरळ येथे १८.४० वाजता पोहोचेल (दैनिक)

Matheran Mini Train
Navi Mumbai : थायलंडचा हायड्रो गांजा नवी मुंबईत विकायचा, भाजप नेत्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्या

(ब) अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा (दैनिक)

१. गाडी क्रमांक 52153 अमन लॉज येथून ०८.४५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे ०९.०३ वाजता पोहोचेल.

२. गाडी क्रमांक 52155 अमन लॉज येथून ०९.३५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे ०९.५३ वाजता पोहोचेल.

३. गाडी क्रमांक 52157 अमन लॉज येथून १२.०० वाजता सुटेल आणि माथेरान येथे १२.१८ वाजता पोहोचेल.

४. गाडी क्रमांक 52159 अमन लॉज येथून १४.२५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे १४.४३ वाजता पोहोचेल.

५. गाडी क्रमांक 52161 अमन लॉज येथून १५.४० वाजता सुटेल आणि माथेरान येथे १५.५८ वाजता पोहोचेल.

६. गाडी क्रमांक 52163 अमन लॉज येथून १७.४५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे १८.०३ वाजता पोहोचेल.

शनिवार / रविवार विशेष सेवा खालीलप्रमाणे:

७. विशेष-१ अमन लॉज येथून १०.३० वाजता सुटेल आणि माथेरान येथे १०.४८ वाजता पोहोचेल.

८. विशेष-३ अमन लॉज येथून १३.३५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे १३.५३ वाजता पोहोचेल.

माथेरान – अमन लॉज शटल सेवा (दैनिक)

१. गाडी क्रमांक 52154 माथेरान येथून ०८.२० वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे ०८.३८ वाजता पोहोचेल.

२. गाडी क्रमांक 52156 माथेरान येथून ०९.१० वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे ०९.२८ वाजता पोहोचेल.

३. गाडी क्रमांक 52158 माथेरान येथून ११.३५ वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे ११.५३ वाजता पोहोचेल.

४. गाडी क्रमांक 52160 माथेरान येथून १४.०० वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे १४.१८ वाजता पोहोचेल.

५. गाडी क्रमांक 52162 माथेरान येथून १५.१५ वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे १५.३३ वाजता पोहोचेल.

६. गाडी क्रमांक 52164 माथेरान येथून १७.२० वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे १७.३८ वाजता पोहोचेल.

शनिवार / रविवार विशेष सेवा खालीलप्रमाणे:

७. विशेष-२ माथेरान येथून १०.०५ वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे १०.२३ वाजता पोहोचेल.

८. विशेष-४ माथेरान येथून १३.१० वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे १३.२८ वाजता पोहोचेल.

Matheran Mini Train
Local Body Election : कंडका पडणार! नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागली, वाचा संपूर्ण वेळापत्रक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com