Cabinet Decisions : निवडणुकीआधी सरकारचा धमाका, मंत्रिमंडळाच्या बैठकीत २१ मोठे निर्णय

CM Fadnavis cabinet meeting : स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने कॅबिनेट बैठकीत २१ महत्त्वाचे निर्णय घेतले. शेतकरी मदत, आरोग्य योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण प्रकल्प, न्यायालये आणि प्रशासनिक सुधारणा यांना मंजुरी देण्यात आली.
maharashtra cabinet decision cm devendra fadanvis
maharashtra cabinet decision cm devendra fadanvisSaam Tv News
Published On

Maharashtra cabinet decisions : राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. आज दुपारी ४ वाजता राज्य आयोगाची त्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडणार आहे. पण त्या बैठकीआधीच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २१ मोठे निर्णय घेण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागपासून अनेक विभागासाठी निर्णय घेण्यात आले आहेत. (Maharashtra cabinet approves 21 key projects before local body elections)

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत २१ वादळी निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याचेही समोर आले. शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप मदत पोहचली नसल्यामुळे मंत्री नाराज होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्याआधी मदत पोहचली नाही तर सामन्यांमध्ये रोष तयार होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात मदत मिळायला हवी, असे मत सर्वांचे होते. निवडणुकीआधी सरकारने कोणते २१ निर्णय घेतले? पाहूयात..

maharashtra cabinet decision cm devendra fadanvis
बॉयफ्रेंडसोबत मुलगी कारमध्ये रात्री गप्पा मारत होती, ३ जणांनी किडनॅप केले, अन् सामूहिक बलात्कारानंतर...

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील २१ निर्णय -

विरार ते अलिबाग बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका (VAMMC) प्रकल्पाच्या कर्जास शासन हमी देण्यास मान्यता. हुडको कडून घेण्यात येणारे हे कर्ज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चासाठी वापरणार आहे. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

नागपूर येथील लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान (एलआयटी) विद्यापीठ, नागपूर विद्यापीठास निधी देण्यास मान्यता. सन २०२५-२०२६ ते सन २०२९-२०३० या कालावधीकरीता दरवर्षी ७ कोटी रुपयांचा निधी चार हप्त्यात वितरीत करण्यात येणार. संस्था १९४२ मध्ये स्थापन झालेली ही संस्था रसायन तंत्रज्ञान क्षेत्रात नावाजलेली संस्था. (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी ( ता. दक्षिण सोलापूर) येथील असंघटित कामगारांच्या प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ३० हजार घरांच्या गृहप्रकल्पास अनर्जित रक्कम, नजराणा रक्कम व अकृषिक करातून सवलत देण्यास मान्यता. (महसूल विभाग)

maharashtra cabinet decision cm devendra fadanvis
Vande Bharat Express: गुड न्यूज! ४ नव्या वंदे भारत एक्सप्रेस होणार सुरू, वाचा कुठून कुठे धावणार, काय असेल मार्ग?

वाशिम जिल्ह्यातील मौजे वाईगोळ ( ता.मानोरा) येथील मधील १.५२ हे.आर. जागा ग्रामपंचायत, वाईगौळ यांना भक्त निवास व यात्रेकरूंसाठीच्या सोयी-सुविधा उभारण्याकरिता विनामूल्य देण्यास मान्यता. (महसूल विभाग)

पुणे जिल्ह्यात घोडनदी (शिरुर) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तसेच शासकीय अभियोक्ता कार्यालय यांची स्थापना होणार. त्यासाठी आवश्यक पद निर्मितीस मान्यता. (विधि व न्याय विभाग)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय होणार. त्यासाठी आवश्यक न्यायीक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पद निर्मितीस मान्यता. (विधि व न्याय विभाग)

maharashtra cabinet decision cm devendra fadanvis
Local Body Election : मोठी बातमी! आयोगाची आज पत्रकार परिषद, निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता

राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी "MAHA ARC LIMITED" बंद करण्यास मंजुरी. केंद्राच्या नॅशनल अँसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापन केली होती, त्याच धर्तीवर राज्य कंपनीची स्थापना सप्टेंबर २०२२ मध्ये स्थापन करण्यात आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२३ मध्ये या कंपनीला परवाना नाकारल्याने, कायदेशीर दृष्ट्या या कंपनीला कामकाज पाहणे शक्य नसल्याने, कंपनी बंद करण्याचा निर्णय. (वित्त विभाग)

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन देण्यासाठी असलेल्या कर वसुलीच्या अटीत सुधारणा. कर्मचाऱ्यांना दिलासा. (ग्राम विकास विभाग)

मत्स्यव्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्याने मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यकास्तकारांना बँकाकडून देण्यात येणाऱ्या अल्प मुदतीच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा देण्यास मान्यता. (मत्स्यव्यवसाय विभाग)

maharashtra cabinet decision cm devendra fadanvis
Mumbai : नरीमन पॉईंट ते विरार फक्त ३५ मिनट, कोस्टल रोड प्रोजेक्टवर मोठी अपडेट

"हिंद-की-चादर" श्री. गुरुतेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० वी शहीदी समागम शताब्दी कार्यक्रमास आवश्यक निधीस मान्यता. नांदेड, नागपूर आणि रायगड जिल्ह्यांतर्गत राज्यभरातील विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ९४ कोटी ३५ लाख ६४ हजार रुपयांच्या निधीच्या तरतुदीस मान्यता. (अल्पसंख्याक विकास विभाग)

प्रस्तावित "महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश, २०२५" मधील तरतुदीमधील सुधारणांना मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)

जमीन मुंबई उपनगर जिल्हातील मौजे वांद्रे ( ता. अंधेरी) येथील ३० वर्ष कालावधीसाठी एक रुपया नाममाफ वार्षिक भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या ६४८ चौ.मी. शासकीय जमिनीसमोरील ३९५ चौ.मी. भुखंडावर आवश्यक अन्य सोयी-सुविधा पुरविण्यास मान्यता. (महसूल विभाग)

अकृषिक कर आकारणी तसेच जमिनीच्या अकृषिक वापराच्या परवानगी व सनदेबाबतच्या तरतुदींमधील सुधारणांना मान्यता. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यात येणार (महसूल विभाग)

maharashtra cabinet decision cm devendra fadanvis
Mumbai : नरीमन पॉईंट ते विरार फक्त ३५ मिनट, कोस्टल रोड प्रोजेक्टवर मोठी अपडेट

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या विस्तारीत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड निर्माण व वितरण करणाऱ्या क्षेत्रिय स्तरावरील कर्मचा-यांच्या (Front Line Workers) मानधनात वाढ करण्यास मंजुरी. (सार्वजनिक आरोग्य विभाग)

राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा आणि चांगले उपचार व्हावेत यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करण्यास मान्यता. (सार्वजनिक आरोग्य विभाग)

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करणार. आरोग्य सुविधांचे विकेंद्रीकरणामुळे नागरिकांना दिलासा. (सार्वजनिक आरोग्य विभाग)

परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ व श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांना मंजुरी. (नियोजन विभाग)

maharashtra cabinet decision cm devendra fadanvis
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज, बँक खात्यावर आजपासून ₹१५०० खटाखट जमा होणार, बॅलेन्स चेक करा

बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापकांची पाच पदे निर्माण करण्यास मान्यता. त्यासाठी आवश्यक खर्चाच्या तरतुदीस मंजुरी. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

वर्धा शहरातील रामनगर येथील भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडधारकाला निवासी भूखंड कायमस्वरुपी मालकी हक्काने देण्यास मंजुरी (नगरविकास विभाग)

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्तीस मान्यता. अभियानात १४ मार्च २०२४ रोजी दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्चाऱ्यांचे समकक्ष पदाव समायोजन. सेवा प्रवेश नियमांत दुरूस्ती न एक वेळची बाब म्हणून समायोजन केले जाणार. सार्वनजिक आरोगय विभागातील पदांबरोबर, ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणारी आरोग्य सेवेतील रिक्त पदांबाबतचा निर्णय. (सार्वजनिक आरोग्य विभाग)

चंद्रपूर जिल्हयातील मुल येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नवीन पदविका अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन सुरु करण्यात येणार. त्यासाठी आवश्यक ३९ शिक्षक व ४२ शिक्षकेतर पदांना व त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता. (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

maharashtra cabinet decision cm devendra fadanvis
Vande Bharat Express: गुड न्यूज! ४ नव्या वंदे भारत एक्सप्रेस होणार सुरू, वाचा कुठून कुठे धावणार, काय असेल मार्ग?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com