Navi Mumbai : थायलंडचा हायड्रो गांजा नवी मुंबईत विकायचा, भाजप नेत्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्या

Navi Mumbai Crime news : नवी मुंबईत थायलंडमधून आणलेल्या हायड्रो गांजाची विक्री करताना भाजप नेत्या बीना गोगरी यांचा मुलगा केयूर गोगरी अटकेत. खारघरमध्ये पोलिसांचा छापा, NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल.
Buldhana Crime
Buldhana CrimeSaam tv
Published On

थायलंडमधून तस्करी करून आणलेला हायड्रो गांजा विकल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईत भाजप नेत्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भाजपच्या भारत रक्षा मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा बीना गोगरी यांचा मुलगा केयूर जयेश गोगरी (२९) याला अटक केली आहे. खारघर सेक्टर १९ मधील घरात पोलिसांनी छापा टाकला. गोगरीच्या घरातून पोलिसांनी ५,००० रुपयांचा ८०० मिलीग्राम हायड्रो गांजा जप्त केला. त्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

खारघरमधील घरावर पोलिसांनी मारला छापा -

गोगरी हा थायलंडमधून आलेल्या हायड्रो गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना एका गुप्त सूत्राने दिली. या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने गोगरी यांच्या खारघरमधील शिवसाई इमारतीत छापा टाकला. पोलिसांना गोगरीच्या अपार्टमेंटमधून प्लास्टिकची पाकिटे, एक क्रशर आणि वजनकाटा जप्त करण्यात आला. पोलिसांनी गोगरी याच्या गाडीचाही तपास केला. त्याच्या गाडीमधून पोलिसांनी हायड्रो गांजा आढळला.

Buldhana Crime
Mumbai : नरीमन पॉईंट ते विरार फक्त ३५ मिनट, कोस्टल रोड प्रोजेक्टवर मोठी अपडेट

थायलंडमधून आणला गांजा -

गोगरीच्या मित्रांनी थायलंडमधून बेकायदेशीर मार्गांनी तस्करी केल्याचा संशय असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अटकेत असलेल्या गोगरीने चौकशीत अनेक गोष्टी कबूल केल्या. भांडूप येथील मित्र शारिखकडून गांजा मिळवल्याचे त्यांने गोगरीने कबूल केले. हा गांजाची थायलंडमधून तस्करी करण्यात आल्याचेही त्याने पोलिसांच्या चौकशीत सांगितले. त्याशिवाय उलवेमधील नोमान या मित्राकडूनही त्याने गांजा घेतल्याचे कबूल केले. खारघरमध्ये हा गांचा विकण्याचा प्लान होता, असेही त्याने पोलिसांच्या तपासात कबूल केले.

Buldhana Crime
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज, बँक खात्यावर आजपासून ₹१५०० खटाखट जमा होणार, बॅलेन्स चेक करा

गुन्हा दाखल -

केयूर जयेश गोगरी याच्यावर पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गोगरीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी थायलंडस्थित ड्रग्ज नेटवर्कशी संबंध असणाऱ्या दोघांचा शोध सुरू केला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्स आहे का? याची चौकशी करण्यात येत आहे.

Buldhana Crime
Cyclone Alert : पुन्हा आस्मानी संकट! 'मोंथा'नंतर आणखी एका चक्रीवादळाचं सावट, महाराष्ट्रावर होणार परिणाम, IMD चा गंभीर इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com