NCP Leader Vikas Lawande Arrested Saam Tv
मुंबई/पुणे

NCP Leader Arrested: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याला पुण्यातून अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

NCP Leader Vikas Lawande Arrested: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

Priya More
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्याला पुण्यातून अटक

  • विकास लवांडे यांना करण्यात आली अटक

  • वारकरी संप्रदायावरील वक्तव्यामुळे विकास लवांडे अडचणीत

  • पुणे पोलिसांची विकास लवांडे यांच्यावर कारवाई

  • राज्याच्या राजकारणात खळबळ

वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुण्यातील वाघोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वारकरी संप्रदायाबाबत विकास लवांडे यांनी वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी जामीनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. पण पुणे कोर्टाने त्यांचा अंतरिम जामीन संरक्षणास मुदतवाढीचा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. खोट्या गुन्ह्यात अटक केल्याची प्रतिक्रिया विकास लवांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. विकास लवांडे यांनी एक्सवर पोस्ट करत कारवाई केल्याची माहिती दिली आहे.

पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी असा संताप लवांडे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोलिसांनी अटक केल्यानंतरचा फोटो पोस्ट करत लिहिले की, 'माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे आणि इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलिस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले होते. पण मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला. कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे?'

या पोस्टमध्ये लवांडे यांनी पुढे असे लिहिले की, 'पोलिस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी, मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे. कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे, कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे.' असं म्हणत लवांडे यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला.

दरम्यान, वारकरी संप्रदाय विषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा विकास लवांडे यांच्यावर आरोप आहे. पुण्यातील वाघोली पोलिस ठाण्यात ८ मे रोजी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विकास लवांडे यांच्याविरोधात बी एन एस कलम २९९, ३०२, १९६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. युट्युबवर मिळालेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून लवांडे यांनी वारकरी संप्रदायविषयी आक्षेपार्य विधान केला असल्याचा आरोप एका महिलेने केला होता. संबंधित महिलेने यानंतर वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने लवांडे यांनी कोर्टात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता मात्र कोर्टाने तो जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे लवांडे यांना अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान! चुकूनही कच्च्या खाऊ नका 'या' ४ भाज्या

Maharashtra News Live Update: जळगाव मध्ये शिवसेनेच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महायुतीची तातडीची बैठक

PM Kisan Yojana: १८ जूनला ₹२००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Jalna : माणुसकीला काळिमा! निर्दयी बापाने पोटच्या पोराला हातपाय बांधून बेदम मारले; मन सुन्न करणारा व्हिडिओ व्हायरल

Model Arrested: बँकॉकहून गांजाची तस्करी करणाऱ्या मॉडेलला अटक; ११.८२ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

SCROLL FOR NEXT