वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक

Kirtankar Sangram Bhandare Ink Attack Vikas Lavande: वारकरी संप्रदायातील घुसखोरीवरून पुन्हा वाद पेटलाय...याच वादातून कीर्तनकार संग्राम भंडारेंनी पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक केलीय. नेमका काय वाद झालाय? स्वत:ला कीर्तनकार म्हणवणारे संग्राम भंडारे हिंसक का झाले?
Kirtankar Sangram Bhandare throws ink at NCP spokesperson Vikas Lawande during a heated confrontation in Alandi.
Kirtankar Sangram Bhandare throws ink at NCP spokesperson Vikas Lawande during a heated confrontation in Alandi.saam tv
Published On

हा व्हिडिओ पाहा... नथुराम गोडसे, लॉरेन्स बिष्णोईचं उदात्तीकरण करणाऱ्या कीर्तनकार संग्राम भंडारेंनी राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर आंळदीच्या मातोबाची इथं शाईफेक केलीय....शाईफेक करताना भंडारे नेमकं काय म्हणतायत... नीट ऐका...

भंडारेंच्या विधानामुळे वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा मुद्दा पुन्हा चिघळलाय. महिन्याभरापूर्वी शरद पवारांनी वारकरी संप्रदायातील घुसखोरांवर एखा लेखातून टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंनी वारकरी संप्रदायातील घुसखोरांची एक यादीच जाहीर केली होती. त्यामुळे संतापलेल्या भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी लंवाडेंना गाठून त्यांच्यावर शाईफेक केली. मात्र यावेळी भंडारें आणि त्यांच्या साथीदारांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही लवांडेंनी केलाय..त्यानंतर भंडारेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र भंडारेंच्या अटकेसाठी पोलीस स्टेशनसमोर लवांडेंसह पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.

दरम्यान लवांडेंवरील शाईफेक प्रकरणानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत...सत्ताधारी नेत्यांनी भंडारेंच्या कृतीचं समर्थन केलयं... तर विरोधकांनी अशा घटनांमुळे व्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीला धोका असल्याचं विधान केलयं...

याआधीही कीर्तनकार संग्राम भंडारेंनी नथुराम गोडसे आणि बिश्नोईच्या विधानाचं समर्थन केलं होतं...त्यानंतर अनेक ठिकाणी राष्ट्रवादीनं भंडारेंच्या विधानाचा जाहीर निषेध केला होता... आता घुसखोरीच्या मुद्द्यावरून तापलेलं राजकारण शाईफेक प्रकरणानं आणखीनच चिघळलंय...मात्र स्वत:ला वारकरी संप्रदायाचा पाईक आणि कीर्तनकार म्हणणाऱ्या व्यक्तीला असं गावगुंडासारखं वागणं शोभतं का? हा प्रश्न आहे. एवढंच नव्हे तर अशा कृत्यांमुळेच वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोपांना नक्कीच बळ मिळतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com