

पुण्यातील केसनंद ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ग्रामपंचायतीसमोर अनोखे कचरा आंदोलन करण्यात आले. पंचायत समिती सदस्य कुशल सातव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने परिसराचे लक्ष वेधून घेतले.
भारतीय हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी २९ जुलै रोजी रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उद्या, २९ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, आश्रमशाळा, आयटीआय आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांना सुटी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनीही अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या परिसरात जाऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी 29 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. संभाव्य अतिवृष्टी आणि आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेसना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सतर्क राहावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात माओवादी असल्याचा बनाव करून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. भामरागड तालुक्यातील पोमके-फुलणार परिसरात माओवादी नावाने बॅनर आणि पत्रके लावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली असून कोठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी केले आहे.
झेनिथ धबधब्यावर आडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका
खोपोली येथील हेल्फ फाऊंडेशन या बचाव पथकाने केले सुटका
झेनिथ धबधब्यावर गेलेले पर्यटक दुपारी नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने आडकुन पडले होते
- शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी संजय गरुडला ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
- नाशिक पोलिसांनी संजय गरुडला काल सोलापूरमधून केली होती अटक
- स्वतःच्या संस्थेतील १५ शाळांमध्ये १७७ शिक्षकांचा गरुड याने मिळवलाय बोगस शालार्थ आयडी
गेली तब्बल सतरा वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
त्यातच आता महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत.
चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवरील उड्डाण पुलाच्या दोन्ही अप्रोच रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, संगमेश्वर, पाली आणि लांजा परिसरातही महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे.
अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणास विरोध दर्शविण्यासाठी धाराशिव मध्ये आज मुसळधार पावसामध्ये आरक्षण उपवर्गीकरण समितीने धाराशिव शहरात मोर्चा काढला. उपवर्गीकरणाच्या विषयावर 27 आमदारानी पत्र दिले तरी मुख्यमंत्री भेटण्यास तयार नाहीत जबरदस्तीने उपवर्गीकरण करण्याचा सरकारचा घाट पण सरकार व सुप्रीम कोर्ट याच्यापेक्षा जनता असते हे दिल्लीतल्या आंदोलनाने दाखवून दिले तरी सरकारने शहाणे व्हावे असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी सरकारला या मोरच्याला संबोधित करताना दिला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासासाठी महिलांना एनसीएमसी (NCMC) कार्ड अनिवार्य करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असून, यामुळे विठ्ठलवाडी एसटी आगारात महिला प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. कार्ड नोंदणीसाठी प्रशासनाने केवळ एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केल्याने आगारात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.महिलांच्या म्हणण्यानुसार, काही दिवस कार्ड तयार करणारी मशीन बंद असल्याने अनेक महिलांना विनाकारण परत जावे लागले.
तरूण आपल्या देशाचे भविष्य आहेत, तरी तरुणांवर हल्ला का? असा मुद्दा लोकसभेतून प्रियंका गांधींनी मांडला आहे. तसेच पेपरफुटी प्रकरणातील एकाही माफियाला शिक्षा नाही असेही त्यांनी लोकसभेत म्हंटले आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणात आत्मसमर्पण केलेला आरोपी सोनुकमार किशनलाल दिवाकर यास आज भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.आरोपीला श्रीम.एस.एस.घोडके यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता 2 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.काल सोनुकुमार दिवाकर ह्याने पोलिसांना आत्मसमर्पण केल्यानंतर त्यास तपास अधिकाऱ्यांनी आय ओ से मागितला होता.तर आज सोनूकुमार दिवाकर ला भिवंडी न्यायालयात हजर केले असता 2 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे.
पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के
3.5 तीव्रतेचा बसला भूकंपाचा धक्का
धुंदलवाडी आंबोली कासा परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला
काही दिवसापूर्वी बसला होता भूकंपाचा धक्का,
आज पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण
खोपोली येथील झेनिथ धबधबा परिसरात 10 ते 12 पर्यटक अडकले
जोरदार पाऊसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि परत येण्याचा मार्ग बंद झाला
बचाव यंत्रणा, पोलिस घटनास्थळी दाखल
पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने बचाव कार्यात अडथळे
पाणी कमी होत नाही तोवर कुठलाही धोका पत्करू नका, बचाव पथकाच्या पर्यटकांना सूचना
रायगडाच्या माणगाव तालुक्यात मुसळधार पाऊस
मुसळधार पावसामुळे लोणेरे विद्यापीठ रस्ता पाण्याखाली
रस्त्यावर दिड ते दोन फुटापर्यंत पाणी
रस्त्यावर पाणी आल्याने विद्यापीठाकडे जाणारा मार्ग वाहतूकसाठी बंद
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हळदीचा लिलाव संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडलाय. एनसीडीईएक्सला हळदीचा दर 21 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे असतांना नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळदीच्या लिलावात मात्र बारा तेरा हजार रुपयांपासून शेतकऱ्यांची उच्च प्रतीची हाळद व्यापारी संगमत करून खरेदी करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करीत हळदीचे लिलाव बंद पाडले.
नागपुर शहरात मुसळधार पाऊस
अवघ्या एक ते दीड तासांचा पावसाने रस्त्यांना नदीचे स्वरूप
शहरात अनेक भागात पावसाचे पाणी साचालं
सातारा -
अखेर 24 तासानंतर केळघर घाट खुला
अथक प्रयत्नांनंतर सातारा –महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक सुरू
सातारा–महाबळेश्वर महामार्गावरील केळघर घाटातील काळा कडा परिसरात कोसळलेल्या महाकाय दरडीमुळे तब्बल 24 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प होती.
रस्त्यावर दगड आणि मातीचा मोठा ढिगारा साचल्याने हा महत्त्वाचा घाटमार्ग बंद ठेवण्यात आला होता.
सिंधुदुर्ग -
वैभववाडी तालुक्यातील करुळ गावठण येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली.
शेतीच्या कामासाठी जात असताना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते पुराच्या पाण्यात वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान करुळ गावातील सह्याद्री जीव रक्षक टीमचे ४० युवक वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध घेत आहेत.
नागपूर -
- सोमलवार स्कूल निकालस शाखा राणाप्रताप नगर रोड खामला येथील ही भयानक स्थिती.
- पाण्याचा निचरा न झाल्यान पाणी साचाल आहे...
- रस्त्याचं चालू असलेलं काम जे उन्हाळ्यात पूर्ण होऊ शकलं नाही आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ते उन्हाळ्यात पूर्ण झालं नाही याचा फटका आज विद्यार्थ्यांना होतो आहे.
- शाळा सुरू आहे मात्र पाण्याचा निचरा न होऊ शकल्याने पावसाचं पाणी शाळेच्या मैदानात साचले आहे...
परीक्षा सुधारणा विधेयक हे आमच्या सरकारमधील ऐतिहासिक निर्णय
विद्यार्थ्यांच्या भवितव्याोसोबत कुणीही खेळू शकत नाही
काँग्रेसच्या काळात अनेकदा पेपरफुटी झाली आहे
पेपरफुटी ही एका राज्यापुरती मर्यादीत नाही
जितेंद्र सिंह -
विधेयकावर ८ तास चर्चा करण्यास सरकार तयार
कठोर कायदा झाल्यास परीक्षा प्रणालीमध्ये प्रामाणिकता येईल
हे आमच्या सरकारचे ऐतिहासिक विधेयक
परीक्षा सुधारणा विधेयकावर लोकसभा-राज्यसभेत चर्चा सुरु
विधेयकावर चर्चा करण्यासाठी आम्ही तयार - किरण रिजेजू
आम्ही १० तास चर्चेसाठी तयार
गंभीर चर्चा होणे गरजेचे
लोकसभेत आज परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे
नाशिक जिल्ह्यात पाऊस नसतांना कोथंबिर जुडीला १२० रुपयांचा दर मिळत होता.मात्र पाऊस सुरु झाला आणि कोथंबिची आवक वाढल्याने दरात घसरण झाली असून,नाशिकच्या येवला तालुक्यातील कोथिंबीर उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.चांगला भाव मिळेल या आशेने लागवड केलेल्या कोथिंबिरीला सध्या केवळ 2 ते 3 रुपये जुडी असा भाव मिळत आहे.सततच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असून, बाहेरगावी मागणी घटल्याने बाजारात आवक वाढली आहे.त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान अपुरे असल्याचे सांगत ते २ लाख रुपये करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. राज्यव्यापी दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बैठका घेत असताना त्यांनी सरकारला इशारा देत, मागणी मान्य न झाल्यास नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे स्पष्ट केले. तसेच कर्जमाफीतून वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्याची आणि गैरप्रकार करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली.
दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला आणि प्लेनेट गनचा मारा याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर द्यावे, अन्यथा शहा यांच्या पुणे भेटीला विरोध करू, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला.
जुन्या काळातील फोटो पाहत सांगितल्या आठवणी,,,,,,,
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आज जुन्या आठवणीत रमले बारामती विद्या प्रतिष्ठान येथे शरद पवार यांना मिळालेल्या भेटवस्तू तसेच शरद पवार यांच्या जीवनातील निवडक काही फोटो लावण्यात आलेले आहेत आज शरद पवार यांनी या म्युझियमला भेट दिली आणि उपस्थितांना फोटो पाहून जुन्या आठवणी सांगितल्या यावेळी काही काळ शरद पवार हे जुन्या आठवणीत रमले
अनुसूचित जातींसाठी भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची गंभीर चिंता समाजामध्ये व्यक्त होत आहे. या उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमधील सामाजिक ऐक्यावर परिणाम होण्याची भीती असून, आरक्षणाच्या मूलभूत उद्देशालाच धक्का बसू शकतो. या पार्श्वभूमीवर या निर्णयाविरोधात पुणे शहरात शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साईबाबांना दानाचा ओघ सुरूच असून, बडोदा येथील साईभक्त विजय नाईक यांनी साई चरणी दोन सुवर्ण ' ओम ' अक्षरे गुरुदक्षिणा स्वरूपात अर्पण केली आहेत.. 51 ग्रॅम वजनाच्या या सुवर्ण ओम ची किंमत साडेआठ लाख रुपये आहे.. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे ही सुवर्ण ओम अक्षरे सुपूर्त करण्यात आली आहेत.. साई संस्थानकडून दानशूर साईभक्ताचा सत्कार करण्यात आलाय..
अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे पहिल्या यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे, कर्जमाफीच्या पहिल्या यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावासमोर कर्जाची रक्कम कमी दाखवण्यात येत असून प्रत्यक्षात कर्जाची रक्कम जास्त असल्याचे शेतकरी सांगत आहेत, क
माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी आज ज्योतिर्लिंग वैजनाथाचे दर्शन घेतले. पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैजनाथ मंदिरात माजी क्रिकेटपटू केदार जाधव आपल्या आई सोबत आले.त्यांनी मनोभावे वैजनाथाला रुद्राभिषेक करत महाआरती देखील केली.यावेळी मोठ्या संख्येने जाधव यांचे चाहते देखील मंदिरात उपस्थित होते. दरम्यान वैजनाथ देवस्थान ट्रस्ट कडून केदार जाधव यांचा प्रतिमा व पंचा देत सत्कार करण्यात आला.यावेळी समर्थकांना केदार जाधव यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
विलास घुले खून प्रकरणी दहा आरोपींना अटक केली असून पुरवणी जवाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचे नाव घेण्यात आल आहे.
मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी पोलीस अधीक्षकांची नुकतीच भेट घेतली होती.
यादरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे चे दोन आरोपींशी मोबाइलवरून बोलणे झाल्याचे सीडीआरचे पुरावे सादर केले होते.
येत्या आठ दिवसात आरोपीला अटक न केल्यास घुले कुटुंबीयांनी आमरण उपोषणाचा इशाराही दिलाय..
आता याप्रकरणी एसआयटीकडून तपासाचा अहवाल पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांच्याकडे देण्यात आला.
खेड शिवापूर पोलिस चौकीतील २ कर्मचाऱ्यांचे निलंबन
पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजित मेस्त्री यांचे निलंबन
२ पोलिसांनी कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई
पुणे शहरातील नवले पुलाजवळ व्यावसायिकाचे १ कोटी रुपये लुबाडण्याच्या प्रयत्नात या दोन्ही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न
लोकसभेत दुपारी २ वाजता कागदगळती प्रतिबंधक विधेयकावर चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी एक दिवस आधीच या विषयावर एकमत साधले आहे. अध्यक्षांनी विधेयकावरील चर्चेसाठी सहा तासांचा वेळ दिला आहे. तथापि, प्रत्येकाला आपली मते मांडण्यासाठी पुरेशी संधी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
- पूर्व विदर्भासह नागपुरात दोन दिवस जुलैला पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्टसह मध्यम ते मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा दिला आहे...
- नागपूर गडचिरोली,गोंदिया,चंद्रपूर,भंडारा जिल्ह्याना पावसाचा ऑरेंज अलर्ट
- गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 38 टक्के पावसाची तूट,त्याखालोखाल वाशीम 35,चंद्रपूर 31 टक्के तूट असल्यानं जुलै महिना लोटून पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नाही आहे..
- बंगालच्या उपसागरामध्ये झालेल्या चक्रीवाद मुळे पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र ही तूट भरून निघावी अशी अपेक्षा केली जात आहे दुसरीकडे शेतकरीही चांगला पाऊस पडावा यासाठी आकाशाकडे आस लावून बसला आहे...
उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.या पार्श्वभूमीवर धरणाचे दोन वक्र दरवाजे उघडून उरमोडी नदीपात्रात १,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.धरणात सध्या ८.५० टीएमसी म्हणजेच सुमारे ८५ टक्के पाणीसाठा झाला आहे.
सावंतवाडी, दोडामार्ग आणि कुडाळ तालुक्यातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे चिंतेत सापडले आहेत. नारळ, सुपारी, केळी व बांबू च्या कोमाचे वन्यप्राण्यांकडून मोठ्याप्रमाणात नासधूस केली जात असून शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. रानटी हत्ती, लाल तोंडाची माकडे, काळ्या तोंडाचे वानर, शेकरू, डुक्कर आणि रान गव्यांच्या उपद्रवामुळे जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
गोवा येथून सुटणारी पणजी शिरोडा मार्गे वेंगुर्ला या कदंबा बसला आजगावमध्ये अपघात झाला. आजगाव वाघबीळ जवळ वळणावर दुचाकीला वाचवण्याच्या नादात कदंबा बस गटारात कलंडली. या बस मधून ४५ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
- रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पाण्याखालीच
- दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत पुराचं पाणी
- गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पूर परिस्थिती कायम
- दशक्रिया विधींसाठी नागपूर त्या स्वरूपात उभारण्यात आलेली शेड गेली पुराच्या पाण्यात वाहून
मुळेगाव गोळीबार प्रकरणातील आठव्या आरोपीला पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली.हा आरोपी मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले;मात्र पोलिसांनी त्याचे नाव जाहीर केले नाही. शिवाय एकूण आठपैकी केवळ सहाजणांचीच नावे सोमवारी जाहीर केली. गोळीबारात वापरलेली पिस्तूल,कार,दुचाकी,सत्तूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
साईबाबांच्या शिर्डीत आजपासून तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे.. उत्सवानिमित्त साईनगरी भक्तांच्या गर्दीने फुलून गेली असून, सकाळपासूनच साई नामाचा जयघोष करत भाविक साई समाधीसह गुरुस्थानचे दर्शन घेत आहेत
जळगाव यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. मुसळधार पावसाऐवजी मध्यम स्वरूपाचा आणि टप्प्याटप्प्याने पडणारा पाऊस शेतीसाठी अधिक लाभदायक ठरत असून, सोयाबीन, कापूस, मका आणि तूर पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
शहादा-शिरपूर महामार्गावरील कळंबू शिवारातील विघ्नहर्ता पेट्रोलियम वर मध्यरात्री 3अज्ञात भामट्यांनी दरोडा टाकला. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 20 ते 25 वयोगटातील आरोपींनी केबिनची काच फोडून ऑपरेटर ला मारहाण करण्यात आली असून आरोपींनी 31 हजार रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 33 हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने लांबवुन पसार झाले.या प्रकरणी अजय गवळे यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
- पाईप आणि कोळसा ठेवलेल्या ठिकाणी लागली आग
- आगीत जीवीत हानी नाही, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
- आज सकाळी लागली आग
- बुटीबोरी पोलीस घटनास्थळी दाखल
रूट निश्चितीतील तांत्रिक अडचणीमुळे अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नाईट लँडिंग आणि टेकऑफला विलंब.
डीव्हीओआर (DVOR) यंत्रणा यशस्वीपणे इन्स्टॉल,तरीही रात्रीच्या उड्डाणासाठी अंतिम मार्ग निश्चित नाही.
एअर इंडियाने डीजीसीएला तांत्रिक अडचणींची माहिती दिली, पर्यायी मार्ग सुचवण्याची प्रक्रिया सुरू.
७२ आसनी विमानाच्या नियोजनाचा पेच,अतिरिक्त विमान ठेवावे की दुसऱ्या विमानतळावरून सेवा वळवावी यावर विचार.
पुणे शहरातील कुठल्या भागात येणार नाही पाणी?
काळेपडळ, हडपसर गावठाण, रामनगर झोपडपट्टी, वैदुवाडी, भीम नगर, मुंढवा, वानवडी गावठाण, कोंढवा गावठाण, मिठा नगर, बी टी कवडे रोड, लक्ष्मी नगर, कॅम्प परिसर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट, कोरेगाव पार्क ब्रिज परिसर, येरवडा गावठाण गुंजन साळवे भाजी मार्केट गांधीनगर, काश्मीर कॉलनी, नवी खडकी, भोसले वस्ती, डेक्कन लाईन, कल्याणी नगर, खराडी गावठाण, चंदननगर, सुतार नगर, आनंद पार्क
- विदर्भात यंदा पावसाने दडी दिल्यामुळे जुलै महिना संपत आला तरी धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा झालेला नाही. २७ जुलैपर्यंत विदर्भातील २६ मोठ्या धरणांमध्ये सरासरी ४९.७६ टक्के जलसाठा असून, गतवर्षी याच दिवशी तो ५५ टक्के होता. त्यामुळे यंदा सुमारे ५ टक्क्यांची तूट नोंदवली गेली आहे.
- नागपूर विभागातील १६ मोठ्या धरणांमध्ये ४७.८५ टक्के पाणीसाठा आहे, तर ४३ मध्यम प्रकल्पांमध्ये ४३.२८ टक्के साठा असून तो गतवर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी कमी आहे. लघु प्रकल्पांमध्येही १४.२९ टक्क्यांची तूट आहे.
- अमरावती विभागातही परिस्थिती समाधानकारक नाही. ३७.६४ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असून काही प्रकल्पांमध्ये स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
जुलैच्या अवघ्या सहा दिवसात 144 तालुक्यात 100 टक्के पावसाची नोंद
राज्यातील एकूण 355 पैकी 144 तालुक्याने जुलै ची पावसाची शंभर टक्के सरासरी गाठलीय
राज्यातील 77 तालुक्यात 75 टक्के पेक्षा जास्त पावसाची नोंद झालीय
95 तालुक्यात 50 टक्के तर 39 तालुक्यात 25 ते 50 टक्के इतका पाऊस झाला आहे
जुलैमध्ये एकही तालुका रेड झोन मध्ये नाही मुंबई आणि कोकण मध्ये महाराष्ट्राने सरासरी गाठली आहे
मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाने सरासरीखूप कमी असल्याची हवामान विभागाची माहिती
कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एका डब्याला आग.
कर्जतजवळ रेल्वे पोहोचताच डब्यातून धूर येऊ लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज.
फायर अलार्म वाजताच झोपेत असलेल्या प्रवाशांची एकच धावपळ.
धूर पसरल्याने काही काळ भीतीचे वातावरण; प्रवाशांना तातडीने सतर्क करण्यात आले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवसीय गुरूपोर्णीमा उत्सवाला आज भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे.. साईबाबांची काकड आरती झाल्यानंतर पारंपारीक पद्धतीने साईबाबांचा फोटो आणि विणा याची मंदिरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.. साईबाबांच्या हयातीत सुरू झालेला गुरूपोर्णीमा उत्सव आजही मोठ्या भक्तीमय वातावरणात शिर्डीत साजरा केला जात आहे.. साईबाबा संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह संस्थानचे अधिकारी, साईभक्त आणि ग्रामस्थ या मिरवणूकीत सहभागी झाले होते..
संग्रामपूर तालुक्यातील उमरा पानाचे येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता दूर करण्याच्या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संग्रामपूर येथील शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन केले. ६५ विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच शिक्षक असल्याने शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप पालकांनी केला. "शिक्षक द्या... आम्हाला शिक्षक द्या..." अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पहिली ते चौथी असे वर्ग असून एकच असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे..
दिवे घाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंग साठी रस्ता बंद
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवे घाट या मार्गावर काम
आज दुपारी १२ पासून वाहनचालकांसाठी घाट राहणार बंद
या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार असल्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाचे आवाहन
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.