Praful Patel removed from NCP financial role : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. पक्षाच्या आर्थिक व्यवहारांचे संपूर्ण अधिकार आता पवार कुटुंबातील सदस्यांकडे सोपवण्यात आले आहेत. पक्षाने निवडणूक आयोगाकडे (ECI) सादर केलेल्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या यादीतून ही माहिती समोर आली आहे.
पक्षाच्या आर्थिक व्यवहारांचे सर्व अधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे देण्यात आले आहेत. यापूर्वी राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्या सहीने आर्थिक व्यवहार होत होते, मात्र आता त्यांना या पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी पार्थ पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जय पवार यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, बँकेतून पैसे काढणे किंवा ठेवणे यांसारखे सर्व व्यवहार आता सुनेत्रा, पार्थ आणि जय पवार यांच्या स्वाक्षरीनेच होतील. शिवाजीराव गर्जे हे पक्षाचे खजिनदार असले तरी, त्यांच्याकडे आता केवळ लेखापरीक्षणाची (Auditing) जबाबदारी असेल. आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार प्रामुख्याने जय पवार यांच्याकडे असतील.
या बदलांमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आता पवार कुटुंबाची पकड अधिक घट्ट झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचे महत्त्व कमी करून सर्व सूत्रे कुटुंबातच ठेवण्याचा प्रयत्न यातून दिसून येत आहे. सुनील तटकरे यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आता प्रफुल्ल पटेल यांचेही अधिकार काढून घेतल्यामुळे हे दोन ज्येष्ठ नेते आगामी काळात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.