Manasvi Choudhary
घरामध्ये बाथरूमची स्वच्छता करणे महत्वाचे आहे. बाथरूमची स्वच्छता करताना अनेकदा बाथरूम ड्रेनेजकडे दुर्लक्ष होते.
ड्रेनेजची स्वच्छता न केल्याने जाळीवर मळ, केस आणि साबणाचे डाग साचतात यामुळे घरामध्ये दुर्गंधी पसरते.
यावर उपाय म्हणून अनेकजण बाथरूम ड्रेनजवर व्हिनेगर टाकतात. मात्र अनेकांना यामागचं कारण माहित नाही.
बाथरूमच्या ड्रेनमधून अनेकदा कुबट वास येतो यासाठी तुम्ही ड्रेनजमध्ये व्हिनेगर टाकल्याने दुर्गंधी दूर होते.
ड्रेनजच्या पाईपमध्ये केस, साबणाचे छोटे तुकडे आणि चिकट घाण साचलेली असते ती साफ करणे कठीण होते. व्हिनेगर टाकल्याने हा सर्व कचरा मऊ होऊन वितळतो.
बाथरूममध्ये ड्रेनजच्या आजूबाजूला बारीक किडे, चिलटे किंवा झुरळे होतात. व्हिनेगरच्या उग्र वासामुळे हे कीटक मरून जातात.