Deputy Chief Minister Sunetra Pawar  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

anand paranjpe resigns from ncp ajit pawar group: सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. आनंद परांजपे यांनी पक्षाची साथ सोडली. त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.

Priya More
  • सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

  • आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली

  • शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा

  • आमदारकी न मिळाल्याने नाराजी असल्याची चर्चा

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी पक्षाची साथ सोडली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. आमदारकी न मिळाल्यामुळे ते नाराज होते त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिंदेगटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होत आहे.

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज राजीनामा दिला. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस तथा प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश समन्वय ठाणे आणि पालघर जिल्हा अशा सर्वच पदांचा राजीनामा दिला. विधानपरिषदेवर आमदारकी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती.

आनंद परांजपे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राष्ट्रवादी पक्षाची साथ सोडल्यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी राजीनामा दिल्याचे पत्र देखील शेअर केले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले की, 'मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माझा १४ वर्षांचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील. आज अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहे.'

गेल्या काही दिवसांपूर्वीच आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री यांची नंदनवन येथे घेतली होती. या भेटीनंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते. ते शिंदेगटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीमधील दोन गट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक म्हणून आनंद परांजपे यांची ओळख होती. मात्र राष्ट्रवादीमधून आव्हाडांना सोडचिट्टी देत त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

SCROLL FOR NEXT