Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनील तटकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय घडामोडींना वेग

Sunil Tatkare Meets Sharad Pawar: सुनील तटकरे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागचे कारण अस्पष्ट आहे. पण त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुरू असलेल्या घडामोडी आणि सुनील तटकरे यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीतून वगळण्यात आल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे चर्चा होऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली ही भेट पहिलीच असल्याचे सांगितले जात आहे. पण आपण शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com