Two College Girls Suffer Electric Shock in Navi Mumbai: 
मुंबई/पुणे

Navi Mumbai: पाण्यात पसरलं हायव्होल्टेज करंट; विजेचा धक्का लागून २ कॉलेज विद्यार्थिनी गंभीर जखमी, नवी मुंबईतील थरकाप उडवणारी घटना

Two College Girls Suffer Electric Shock in Navi Mumbai: सध्या मुंबई आणि उपनगरांसह नवी मुंबईतही मुसळधार पाऊस पडतोय. या मुसळधार पावसात नवी मुंबईतील नेरूळ परिसरातून एक थरारक घटना घडलीय.

Bharat Jadhav

  • नेरूळमधील एल.पी. ब्रिजखाली कथित शॉर्टसर्किटमुळे पावसाच्या पाण्यात करंट पसरल्याची घटना घडली.

  • या घटनेत दोन कॉलेज विद्यार्थिनींना विजेचा धक्का बसून त्या गंभीर जखमी झाल्या.

  • नेरूळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Navi Mumbai Lp Bridge Short Circuit: नवी मुंबईच्या नेरुळमधील धक्कादायक घटना समोर आलीय. 2 विद्यार्थ्यांना रस्त्यावर विजेचा शॉक लागल्याची माहिती समोर आलीय.नेरूळमधील एल.पी. ब्रिजखाली वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने दोन कॉलेज विद्यार्थ्यांना करंट लागल्याची माहिती मिळतेय. दोघेही पाण्यात पडले असून, त्यांना तातडीने रिक्षातून डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नेरूळ पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

नेरूळ येथील एल.पी. ब्रिजखाली असलेल्या बिकानेर स्वीट्स समोर अचानक एका वायरमध्ये शॉर्टसर्किट झाले. पाण्यात विद्युतप्रवाह पसरल्याने तेथून जाणाऱ्या दोन कॉलेज तरुणी या करंटच्या थेट संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने नवी मुंबईत एकच खळबळ उडालीय.

नवी मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्याच रस्त्यावर एल.पी. ब्रिज खाली जवळील बिकानेर स्वीट्समोर इलेक्ट्रिक वायर तुटून शॉर्टसर्किट झालं. त्याचा झटका दोन स्कूटरवरून जाणाऱ्या विद्यार्थिनींना लागला. या घटनेचे गांभीर्य ओळखून आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. दोन्ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तरुणींना एका रिक्षातून तातडीने डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नेरूळ आणि एल.पी. परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना प्रशासनाच्या अशा निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला का, असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहेत.

पावसामुळे लोकल ट्रेन- बस वाहतूक सेवेला फटका

मुंबईतील या पावसाचा परिणाम रेल्वे सेवेलाही बसला आहे. शहरातील तिन्ही प्रमुख लोकल मार्गांवर गाड्या उशीराने धावतायत. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा साधारण 15 ते 20 मिनिटांनी उशिराने सुरू आहेत. पश्चिम रेल्वेवरील गाड्या 5 ते 10 मिनिटांनी उशिराने धावत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी

Nariman Point Cuffe Parade: नरिमन पॉईंट ते कफ परेडचा प्रवास होणार काही मिनिटांत; मंत्रालय परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार

ठाकरे गटाला मोठं भगदाड; २६ वर्षात ९ महत्त्वाच्या नेत्यांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ

पावसाळ्यात संध्याकाळी नाश्त्याला बनवा मटकीची कुरकुरीत भजी; एकदा खाल तर खातच राहाल

NHMच्या कर्मचाऱ्यांचं नशीब पालटलं; सलग 10 वर्षे कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'

SCROLL FOR NEXT