navi mumbai police bharti schedule revised today Saam Digital
मुंबई/पुणे

Navi Mumbai Police Bharti: पाेलिस भरतीत पावसाचे विघ्न, जाणून घ्या नवी मुंबईचे नवे वेळापत्रक

navi mumbai police bharti schedule revised today: महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात पाेलिस भरतीस आज प्रारंभ झाला. पाेलिस भरतीसाठी राज्यातील युवक माेठ्या संख्येेने मैदानात उतरल्याचे चित्र आहे.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

राज्यभरात आजपासून पाेलिस भरतीस प्रारंभ झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडत असून काही ठिकाणी पाेलिस भरतीच्या मैदानी चाचणी घेण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत. नवी मुंबईत पावसामुळे मैदानी चाचणी घेण्यातील अडचणी लक्षात घेता पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी नवी मुंबई पोलिस भरती प्रक्रियाचे वेळापत्रकात बदल केला आहे.

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयामध्ये 185 पोलिस शिपाई रिक्त पदांची प्रवर्ग निहाय भरती प्रक्रिया आजपासून सुरु होणार होती. दरम्यान नवी मुंबई परिसरात मंगळवार पासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे मैदानी चाचणी घेण्यायोग्य नसल्याचे मत अधिकारी वर्गाचे झाले.

आज (ता.19) भरती प्रक्रियेसाठी आलेल्या आणि उद्या (ता. 20) येणाऱ्या उमेदवारांची चाचणी येत्या 23 जून रोजी होणार आहे. तसेच 21 जून आणि 22 जून रोजी जे उमेदवार येणार होते त्यांची मैदानी चाचणी आता 27 जून रोजी घेतली जाणार आहे अशी माहिती नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jitendra Awhad: सनातन धर्मानं छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं; जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

Pune News: दर्गा बेकायदा असल्याचा दावा; सकल हिंदू समाज आक्रमक, पाहा VIDEO

Buldhana Crime : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या आयुष्यात दुसऱ्याची एन्ट्री, एक्स-बॉयफ्रेंड बिथरला, रागात जे केलं त्यानं बुलढाणा हादरलं

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT