Navi Mumbai Airport Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Airport: दोन दिवसात नवी मुंबई एअरपोर्ट होणार सुरु; काय सुविधा मिळणार? जाणून घ्या A टू Z माहिती

Navi Mumbai Airport to Start Commercial Service: नवी मुंबई एअरपोर्ट २५ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. हे एअरपोर्ट डिजिटल असणार आहे. एअरपोर्टवर तुम्हाला मोफत वाय फाय सुविधा मिळणार आहे.

Siddhi Hande

नवी मुंबई एअरपोर्ट २५ डिसेंबरपर्यंत होणार सुरु

२५ डिसेंबरला व्यावसायिक सुविधा सुरु होणार

हाय टेक डिजिटल टर्मिनल आता नागरिकांसाठी सुरु

मुंबई आणि मुंबईजवळील नागरिकांचा प्रवास हा खूप सोपा आणि जलद व्हावा, यासाठी नवी मुंबई एअरपोर्ट सुरु करण्यात आले आहे. आता प्रवाशांना नवी मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करता येणार आहे. अनेक काळानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २५ डिसेंबरपासून व्यावसायिक सेवा सुरु करणार आहे.

नवी मुंबई एअरपोर्ट सुविधा

नवी मुंबई एअरपोर्ट हे देशातील सर्वात आधुनिक विमानतळापैकी एक आहे. यामुळे मुंबई एअरपोर्टवरील ताण कमी होईल. याचसोबत प्रवाशांनाही फायदा होणार आहे.

नवी मुंबई विमानतळ हे टप्प्याटप्प्याने सुरु केले जाईल. सुरुवातीला मर्यादित उड्डाणे सुरु होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यात दरवर्षी अंदाजे २० दशलक्ष प्रवासी विमानतळावरुन प्रवास करु शकतात. भविष्यात ९० दशलक्ष प्रवाशांपर्यंत मर्यादा वाढवण्याची योजना आहे. दरम्यान, या नवी मुंबई एअरपोर्टसाठी १९,६५० लाख रुपये खर्च आला आहे.

मोफत वाय-फाय सुविधा (Free Wifi On Navi Mumbai Airport)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे डिजिटल असणार आहे. या टर्मिनलमध्ये तुम्हाला मोफत हाय स्पीड वाय फाय मिळणार आहे. या वायफायवर कनेक्ट झाल्यावर अदानी वन अॅपद्वारे रिअल टाइम अपडेट्स मिळतील. यामुळे तुमच्या फोनवर फ्लाइटसंबंधित सर्व माहिती मिळणार आहे.

व्हर्च्युअल माहिती

तुम्हाला तुमच्या फ्लाइटबाबत सर्व माहिती एका अॅपवर मिळणार आहे. तुम्हाला फ्लाइट स्टेट्‍स, बोर्डिंग गेट, टाइमटेबलमधील बदल, अलर्ट सर्व माहिती मिळणार आहे. यामुळे तुम्हाला सारखे रिसेप्शनवर जाण्याची गरज नाही. प्रवाशांसाठी डिस्प्ले बोर्ड लावण्यात आले आहे. यामुळे सर्वकाही डिजिटल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dnyanada Ramtirthkar : अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर अडकणार लग्न बंधनात, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: माजी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यांचा साखर कारखाना ग्रामस्थांनी बंद पाडला

Aries yearly horoscope: मेष राशीच्या व्यक्तींसाठी कसं असणार नवं वर्ष? कशी असेल आरोग्य आणि लव्ह लाईफ, पाहा

Sayali Sanjeev: दिसतीया भारी, नेसूनी साडी, काळजाचं पाणी पाणी करतीया पोर ही

MNS-Shivsena Alliance: मोठी बातमी! मनसे-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब, संजय राऊतांनी तारीख अन् वेळ सांगितली

SCROLL FOR NEXT