

ट्रॅव्हल इन्शुरन्समुळे प्रवासादरम्यान होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल.
ऑनलाइन अर्ज करून काही मिनिटांत ट्रॅव्हल इन्शुरन्स घेता येईल.
फ्लाइट रद्द होणे किंवा बॅग हरवण्यावर विमा सुरक्षा मिळते.
अनेकांना प्रवास करण्याची हौस असते. देशांतर्गत असतो आंतरराष्ट्रीय सहली प्रवास करण्याची इच्छा असणारे कुठेही जाण्यास तयार असतात. पण प्रवास जितका मजेदार असतो तितकाच कधी कधी त्रासदायक ठरत असतो.फ्लाइट रद्द होणे, बस चूकणे, वस्तू हरवणे किंवा अचानक आजारपण येणं, यासर्व गोष्टींमुळे क्षणार्धात ट्रिपची मजा नाहीसा होत असते. यासर्व कटकटीपासून प्रवास विमा (इनशुरन्स) तुम्हाला सुटकेचा श्वास मिळवून देईल.
या विम्यामुळे तुमचे पैसे वाचवता आणि तुम्हाला इतर होणाऱ्या त्रासापासून सु्द्धा मुक्ती मिळते. जर तुमच्याकडे प्रवास विमा नसेल, तर आमच्या टिप्स वापरून आजच अर्ज करा.
जर तुमची फ्लाइट रद्द झाली किंवा फ्लाइटला काही तासांचा उशीर झाला, तरट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला परतावा मिळवून देतो. यामुळे अनपेक्षित खर्चाची शक्यता कमी होते.
प्रवास करताना बॅग हरवणे ही सामान्य गोष्ट बनलीय. जर तुमच्याकडे विमा असेल, तर तुम्हाला तुमच्या पॉलिसी अंतर्गत भरपाई मिळू शकते. हा पर्याय विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी फायदेशीर ठरतो
जर तुम्हाला तुमच्या प्रवासादरम्यान आजार किंवा अपघात झाला तर ट्रॅव्हल इन्शुरन्स वैद्यकीय खर्च मिळवून देतो. काही पॉलिसी कॅशलेस हॉस्पिटलायझेशन सेवादेखील देतात. उपचाराचा खर्च खूप कमी होत असतो.
जर तुमच्या पासपोर्ट हरवला तर ट्रॅव्हल इन्शुरन्स तेव्हाही कामात येतो. प्रवास विमा तुम्हाला हरवलेले पासपोर्ट परत मिळविण्यात मदत करके. त्यात एक विमा पर्याय देखील समाविष्ट आहे, जे तात्पुरता पासपोर्ट किंवा नवीन पासपोर्ट मिळविण्याचा खर्च कव्हर करत असतो. त्यासाठी तुम्हाला फक्त वेळेवर तक्रार नोंदवावी लागेल, जेणेकरून सर्व काम वेळेवर करता येईल.
तुम्हाला माहिती भरावी लागेल. तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स कंपनीच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि फॉर्म भरावा लागेल. तुम्ही एजंटला सर्व ट्रॅव्हल इन्शुरन्सची माहिती आधी विचारून घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.