

नवी मुंबई एअरपोर्टवरुन थेट नागपूर गाठता येणार
अवघ्या दीड तासात होणार प्रवास
२५ डिसेंबरपासून सुरु होणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमुळे आता प्रवास खूप सोपा झाला आहे. नवी मुंबई एअरपोर्टमुळे आता तुम्हाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. नवी मुंबई ते नागपूर अशी आता फ्लाइट सुरु केली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळावरुन नागपूर थेट जाता येणार आहे. ही उड्डाणे २५ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत.
२५ डिसेंबरपासून होणार सुरु (Navi Mumbai Airport to Nagpur Flight)
इंडिगो एअरलाइन्सने ख्रिसमसच्या दिवशी मुंबईहून नागपूरसाठी फ्लाइट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आहे नागपूरवरुन नवी मुंबई मार्गे मुंबईला जाता येणार आहे. नवी मुंबई विमानतळ हे नुकतेच सुरु झाले आहे. नवी मुंबई विमानतळावरुन आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता येणार आहे.
नागपूर ते नवी मुंबई विमासेवेचा सर्वाधिक फायदा प्रवासी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. या नवीन कनेक्टिव्हिटीमुळे विदर्भ आणि मुंबईमधील दळणवळनण गतिमाण होईल. व्यापार, पर्यटन आणि रोजगारनिर्मिती होईल. तुम्हाला इंडिगो एअरलाइन्सचे तिकीट बुक करता येणार आहे.
तिकीट किती? (Navi Mumbai Airline Ticket Price)
नवी मुंबई ते नागपूर तिकीट दर ५००० ते ८००० असण्याची शक्यता आहे. ही सेवा परवडणारी असणार आहे. नवी मुंबई विमानतळावरुन सुरु होणारी ही पहिलीच देशांतर्गत विमानसेवा मानली जाते.यानंतर इतर ठिकाणीदेखील विमानसेवा सुरु करण्यात येईल. यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शहराला जोडता येणार आहे.
अवघ्या काही तासात नवी मुंबई ते नागपूर
नवी मुंबई ते विदर्भ दळणवळण सुलभ होणार आहे. तुम्ही हे तिकीच इंडिगोच्या वेबसाइटवर जाऊन बुक करु शकतात. २५ डिसेंबरला पहिले उड्डाण होईल. त्यामुळे अवघ्या काही तासात तुम्ही नागपूरला पोहचू शकतात. अवघ्या दीड तासात तुम्ही मुंबईवरुन नागपूरला पोहचू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.