Famous Actress : "हिरोच त्याच्या चित्रपटाची हिरोईन निवडतो..."; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितलं बॉलिवूडमधलं सत्य

Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा सध्या 'अस्सी' चित्रपट थिएटरमध्ये पाहायला मिळत आहे. नुकतेच तिने बॉलिवूडवर मोठे विधान केले आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
Taapsee Pannu
Famous Actresssaam tv
Published On
Summary

तापसी पन्नूचा 'अस्सी' चित्रपट 20 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे.

'अस्सी' चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. हा एक कोर्टरूम ड्रामा आहे.

हिरो अनेकदा चित्रपटाची हिरोईन निवडतो, असे विधान तापसीने केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या 'अस्सी' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. ती कायम आपल्या दमदार अभिनय आणि स्पष्टवक्ता स्वभावासाठी ओळखली जाते. अलिकडेच दिलेल्या एका मिडिया मुलाखतीत तापसी पन्नूने बॉलिवूड विषयी मोठे विधान केले आहे. ती म्हणाली की, " हिरो अनेकदा चित्रपटाची हिरोईन निवडतो..." तापसी पन्नू असे का म्हणाली, जाणून घेऊयात.

मुलाखतीत तापसीला विचारले की, "स्पष्टवक्त्यामुळे तिचे व्यावसायिक नुकसान झाले का?" यावर अभिनेत्री म्हणाली की, "मला हे कधीही थेट सांगितले गेले नाही. जर काही घडले असेल तर ते माझ्या लक्षात आले नाही...कधीकधी तुम्हाला कळते की चित्रपटाचा हिरो तुम्हाला त्याचा भाग बनवू इच्छित नाही...कधीकधी हिरोला तुम्ही चित्रपटात नको असता. हिरो त्याच्या चित्रपटाची हिरोईन ठरवतो. इंडस्ट्रीमध्ये हे सामान्य आहे. बहुतेक चित्रपटांमध्ये, हिरोचा खूप प्रभाव असतो..."

पुढे तापसी म्हणते, "हिरो-हिरोईन असलेल्या चित्रपटांमध्ये कास्टिंगबद्दल नायकाच्या मताला अनेकदा जास्त महत्त्व दिले जाते." हे सांगताना तिने राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' चित्रपटाचे उदाहरण दिले. ती म्हणाली, "दिग्दर्शक मोठा स्टार असतो तेव्हा मुख्य अभिनेत्यालाही दिग्दर्शकाच्या नियमांचे पालन करावे लागते. कारण जेव्हा ते म्हणतात, की त्यांना एखाद्याला कास्ट करायचे आहे, तेव्हा त्यांना कास्ट करायचेच असते. दिग्दर्शक पूर्णपणे आत्मविश्वासू असतो. जेव्हा राजू सर मला 'डंकी' चित्रपटात कास्ट करू इच्छित होते, तेव्हा मी त्या चित्रपटात होते. तो सर्वांनाच मोठा धक्का बसला असेल, कारण मी त्या चित्रपटांच्या किंवा शाहरुख खानच्या चित्रपटांच्या नेहमीच्या सर्किटमध्ये नाही.त्यामुळे ते खूपच आश्चर्यचकित करणारे होते. "

शेवटी तापसी म्हणाली की, "कधीकधी मला असे ऐकायला मिळते की, माझ्यासोबत काम करणे थोडे कठीण आहे. मला ते समजत नाही कारण जो कोणी माझ्या फिल्मोग्राफीकडे पाहतो त्याला कळेल की, माझ्यासोबत काम केलेल्या दिग्दर्शकांनी मला पुन्हा पुन्हा कास्ट केले आहे. ज्यांच्यासोबत काम करणे कठीण आहे त्यांच्यासोबत असे होऊ शकत नाही. कोणालाही त्यांच्या चित्रपटांमध्ये वारंवार त्रास नको असतो. अर्थात, ज्यांनी माझ्यासोबत काम केले नाही ते असे म्हणतात कारण ते कदाचित मला ओळखत नाहीत."

Taapsee Pannu
Nana Patekar : "संस्कार, सत्ता, समर्पण...;" नाना पाटेकरांचं OTT वर पदार्पण; पहिल्या वेब सीरिजचा जबरदस्त टीझर आलाय | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com