Navi Mumbai Traffic: नवी मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! १ वर्षासाठी वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Kharghar–Turbhe Link Road Work: नवी मुंबईमध्ये खारघर, बेलापूर आणि तुर्भे भागातून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. याठिकाणी खारघर- तुर्भे लिंक रोडच्या कामासाठी वाहतूक मार्गात मोठे बदल केले आहेत. कुठून कसा प्रवास कराल वाचा सविस्तर...
Navi Mumbai Traffic : नवी मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! १ वर्षासाठी वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Navi Mumbai TrafficSaam RTv
Published On

Summary -

  • सिडकोच्या KTLR भूमिगत बोगदा प्रकल्पाचे काम २० नोव्हेंबरपासून सुरू

  • या लिंक रोडच्या कामामुळे नवी मुंबईमध्ये वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले

  • २० नोव्हेंबरपासून पुढील १ वर्ष सर्व वाहतूक मार्गात बदल राहणार आहेत

  • सायन-पनवेल महामार्गावरील काही रस्ते एकेरी करण्यात आलेत

नवी मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. नवी मुंबईमध्ये वाहतूक मार्गात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. सिडकोच्या खारघर- तुर्भे लिंक रोड भूमिगत बोगदा प्रकल्पाच्या बांधकामाला २० नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. या कामासाठी वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. तब्बल १ वर्षापर्यंत वाहतूक मार्गात बदल राहणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी प्रवास करताना थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे.

नवी मुंबई वाहतूक पोलिस विभागाने वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पुढील वर्षी १६ नोव्हेंबरपर्यंत एक वर्षाच्या कालावधीसाठी वाहूतक वळवण्याचा आराखडा तयार केला होता. २० नोव्हेंबरपासून या प्रोजेक्टचे काम सुरू करण्यात आले असून आता पुढील वर्षभरापर्यंत हे बदल कायम राहणार आहेत. १.७६३ किमी लांबीच्या या प्रोजोक्टचे काम खारघर, बेलापूर आणि तुर्भे दरम्यानचा प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी करणार आहे. खारघर-तुर्भे लिंक रोडमुळे तुर्भे आणि खारघरदरम्यानचा प्रवासाचा वेळ ४० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत कमी होईल. या लिंक रोडमुळे सायन-पनवेल महामार्गावर देखील वाहतूक कोंडी कमी होईल.

Navi Mumbai Traffic : नवी मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! १ वर्षासाठी वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! १० नोव्हेंबरपर्यंत शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

नवी मुंबई वाहतूक पोलिस विभागाचे डीसीपी तिरुपती काकडे यांनी सांगितले की, तुर्भे वाहतूक युनिटच्या हद्दीत खारघर गुरुद्वारा ते जुईनगर रेल्वे स्थानकापर्यंत भूमिगत केटीएलआर प्रकल्पाचे बांधकाम २० नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आले. सायन-पनवेल महामार्गावरील शिरवणे पुलाच्या सुमारे १०० मीटर आधी बांधकाम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे सायन-पनवेल महामार्गाच्या पुणे कॅरेजवेवरील सावन नॉलेज पार्क कंपनी ते शिरवणे एमआयडीसी ते डेल्टा स्टेलर कंपनीकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 'एकेरी' असेल. ज्यामध्ये पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि सरकारी वाहने यासारख्या आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी असणार आहे.

Navi Mumbai Traffic : नवी मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! १ वर्षासाठी वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Kalyan Shil Road Traffic : कल्याण शीळ रोडवर तब्बल २० दिवस मेगा ट्रॅफिक ब्लॉक; पर्यायी रस्ता काय? जाणून घ्या

तसंच, या प्रोजेक्टच्या कामादरम्यान वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग देखील सांगण्यात आले आहे. उरण फाट्यावरून येणारी वाहने तुर्भे एमआयडीसी रस्त्यावर वळवली गेली आहेत. नेरुळहून अंतर्गत रस्त्यांनी येणारी वाहने सायन-पनवेल महामार्गावर वळवली गेली आहेत. तर शिरवणे गावातून एमआयडीसीकडे येणारी वाहने प्रवेशद्वाराजवळील सुरू असलेल्या भूमिगत बोगद्याच्या कामाकडे जाणारी वाहने प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. शिरवणे गावातून येणारी वाहने जुईनगर रेल्वे स्टेशन सर्व्हिस रोडकडे वळवली गेली आहेत. शिरवणे गावातून नेरुळमधील एलपी ब्रिजकडे येणारी वाहने एलपी ब्रिज सर्व्हिस रोडकडे वळवली गेली. तसंच, नेरुळ आणि शिरवणे गावातून जाणारी वाहने सायन-पनवेल महामार्गाच्या मुंबई कॅरेजवेकडे वळवली आहेत. हे वाहतूक मार्गातील बदल १ वर्षांसाठी असणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी याची नोंद घेतच प्रवास करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Navi Mumbai Traffic : नवी मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! १ वर्षासाठी वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Traffic Signal Light: ट्रॅफिक लाईट म्हणजे काय? लाल, हिरवा आणि पिवळा रंगाचा अर्थ काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com