Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! १० नोव्हेंबरपर्यंत शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?
Pune Traffic Saam Tv

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! १० नोव्हेंबरपर्यंत शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic Police: पुणे शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. केशवराव जेधे चौक भुयारी मार्ग दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग देखील सांगितले आहेत.
Published on

Summary -

  • स्वारगेट येथील केशवराव जेधे चौक भुयारी मार्ग दुरुस्तीसाठी बंद

  • हा मार्ग १० नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार

  • शंकरशेठ रस्त्यावरील वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग निश्‍चित करण्यात आले

  • वाहतूक पोलिसांनी नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

सागर आव्हाड, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरातील वाहतूक मार्गत मोठे बदल करण्यात आले आहेत. स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग आज रात्री ११ वाजल्यापासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या भुयारी मार्गाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्गाच्या दुरुस्तीची कामे १० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार असून तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. केशवराव जेधे चौकातील भुयारी मार्गाच्या कडेच्या भिंतींमधून पाणी गळत असून भुयारी मार्गामध्ये पाणी साचते. त्यामुळे या मार्गावरून वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! १० नोव्हेंबरपर्यंत शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?
Pune Land Scam: १८०० कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, ३ जणांविरोधात गुन्हा

पुढील तीन दिवसांत भुयारी मार्गात हे दुरुस्तीचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शंकरशेठ रस्त्यावरून येणाऱ्या वाहनचालकांनी भुयारी मार्गाने न जाता डावीकडील रस्त्याने जेधे चौकात येऊन तेथून सारसबागेकडे वळावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे. या काळामध्ये वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणेकरांना करण्यात आले आहे.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! १० नोव्हेंबरपर्यंत शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?
Pune News : पुण्यात शासनाची फसवणूक, ४६ बोगस दिव्यांग शिक्षकांची नावं समोर; कारवाईची टांगती तलवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com