Kalyan Shil Road Traffic : कल्याण शीळ रोडवर तब्बल २० दिवस मेगा ट्रॅफिक ब्लॉक; पर्यायी रस्ता काय? जाणून घ्या

Kalyan Shil Road Traffic block : कल्याण शीळ रोडवर तब्बल २० दिवस मेगा ट्रॅफिक ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. पर्यायी रस्ते जाणून घ्या.
Kalyan news
kalyan newsSaam tv
Published On
Summary

कल्याण-डोंबिवलीमध्ये जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

कल्याण-शीळ रोडवर वाहतूक निर्बंध

१० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधित वाहतूक निर्बंध

नवी मुंबई, ठाणे येथून कल्याण-डोंबिवलीमध्ये जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. वाहतूक विभागाने कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे २० दिवस कल्याण-शीळ रोडवर वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. १० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधित वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे वाहनधारकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.

एमएमआरडीए तर्फे मेट्रो १२ (कल्याण-तळोजा) या प्रकल्पाचं काम सुरु आहे. यामुळे कल्याण शीळ रोड येथील सोनरपाडा चौक-मानपाडा चौक या भागात वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. एमएमआरडीएतर्फे पिलर सिमेंट गर्डर बसवण्याचे काम सुरू असणार आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने या भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

Kalyan news
Delhi Blast : दिल्लीतील स्फोटामुळे खळबळ; देशाला हादरवणाऱ्या घटनेवर कोण काय म्हणाले?

वाहतूक विभागाने स्पष्ट केलं आहे की, कल्याण शीळ रोडवर पत्रीपुल ते रुनवाल चौकदरम्यान मेट्रो १२ म्हणजे कल्याण-तळोजा प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. याच प्रकल्पाच्या कामासाठी १० नोव्हेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत कल्याण शीळ रोडवरील सोनारपाडा चौक ते मानपाडा चौकापर्यंत पीलर नंबर ११७ ते १८९ वर मोठ्या क्रेनच्या साहाय्याने सिमेंट गर्डर ठेवण्याचे काम करण्यात येणार आहे. या कालावधित वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात आलेत.

Kalyan news
Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कुठे प्रवेश बंद?

कल्याण शीळ रोडवरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मानपाडा चौक, मेट्रो पीलर नं.२०१ येथे 'प्रवेश बंद' करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग काय?

सदरची वाहतूक मानपाडा चौक पीलर नं.२०१ येथून डावीकडे वळण घेऊन सर्व्हिस रोडने सोनारपाडा चौकापर्यंत येथून पुन्हा उजवीकडे वळण घेऊन कल्याण शीळ रोडवरून इच्छीतस्थळी जाता येईल.

Kalyan news
Couple Kiss in Car : कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का?

कुठे प्रवेश बंद ?

कल्याण शीळ रोडवरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डी.एन.एस चौक पीलर नं. १४४ येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग?

सदरची वाहतूक डी.एन.एस. चौक पीलर नं. १४४ येथून डावीकडे वळण घेवून सर्विस रोडने सुयोग हॉटेल, अनंतम रिजन्सी चौक येथून पुन्हा उजवीकडे वळण घेवून कल्याण रोडवरून इच्छितस्थळी जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com