Delhi Blast : दिल्लीतील स्फोटामुळे खळबळ; देशाला हादरवणाऱ्या घटनेवर कोण काय म्हणाले?

Delhi blast update : दिल्लीतील स्फोटामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. देशात घडलेल्या या घटनेवर सर्व प्रमुख नेत्यांनी भाष्य केलं आहे.
Delhi  news
Delhi Saam tv
Published On
Summary

दिल्लीतील स्फोटात ८ जणांचा मृत्यू

दिल्लीतील स्फोटावर दिग्गज नेत्यांच्या प्रतिक्रिया

स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी

दिल्लीतील स्फोटाने देशभरात खळबळ उडाली आहे. देशाला हादरवणाऱ्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. एका कारमध्ये स्फोट झाला. दिल्लीतील स्फोटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पोस्ट करत घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी पोहोचले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, 'i20 कारमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर आजूबाजूच्या वाहनांना आग लागली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी सुरु केला आहे. घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज देखील तपासण्यास सुरुवात केली आहे'.

'दिल्ली स्फोटप्रकरणी पोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखेचे इन्चार्ज यांच्यासोबत बोलणं झालं आहे. सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. सर्व बाजूने तपास केला जात आहे. तपासानंतर सर्व बाबी जनतेसमोर ठेवू. काही वेळात मी घटनास्थळी पोहोचत आहे. मी रुग्णालयात पोहोचणार आहे, असे ते म्हणाले.

स्फोटानंतर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आज सायंकाळी झालेल्या दिल्लीतील स्फोटात ज्यांनी जवळचे लोक गमावले, त्यांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो. जखमी झालेले लोक लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो. अधिकारी घटनास्थळी नागरिकांना मदत करण्याचे काम करत आहे. मी गृहमंत्री अमित शहा आणि इतरद अधिकाऱ्यांसोबत बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आहे'.

राहुल गांधी काय म्हणाले?

विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, 'दिल्लीतील लाल किल्ली मेट्रो स्टेशनजवळ झालेली कार स्फोटाची बातमी अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक आहे. या घटनेत निरपराध लोकांच्या मृत्यूची बातमी दु:खद आहे. या दुर्देवी घटनेत प्रियजनांना गमावेलेल्या शोकाकुल कुटुंबासोबत उभा आहे. त्यांच्याप्रति मी संवेदना व्यक्त करतो. या घटनेतील जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com