Vishal Gangurde
सार्वजनिक ठिकाणी अनेक तरुण-तरुणी कायद्याच्या मर्यादा ओलांडताना दिसतात. या तरुण-तरुणींनी भान ठेवणं गरजेचं आहे.
कारमध्ये बसून किस करणं गुन्हा आहे का, याविषयीचा कायदा जाणून घेऊयात.
भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४ नुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणं गुन्हा मानला जातो.
तुम्ही पार्किंग लॉट, बाग, समुद्र किनारा, मॉल किंवा रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये अश्लील कृत्य केल्यास पोलीस कारवाई करू शकतात.
सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्यास तीन महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.
सार्वजनिक ठिकाणी तुमचं वर्तन त्रास किंवा अस्वस्थता निर्माण करत असेल तर पोलिसांना कारवाईचा अधिकार आहे.
तुम्ही सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्यानंतर एखाद्याने औपचारिक तक्रार केल्यास कारवाई होऊ शकते.
जोडपं सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करताना आढळलं. त्यावेळी पोलिसांनी विरोध केला, त्यानंतर जोडप्याने पोलिसांशी वाद केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
Next : लग्नानंतर महिला गुगलवर काय सर्च करतात?