Maharashtra Live News Update: खारघरमध्ये ‘हिंद की चादर’ कार्यक्रमात बॅनर कोसळला; महिलेला किरकोळ दुखापत

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६, महाराष्ट्रात अर्थसंकल्प अधिवेशन, राज्यातील राजकीय घडामोडी, अवकाळी पाऊस, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam TV Marathi News
Published On

खारघरमध्ये ‘हिंद की चादर’ कार्यक्रमात बॅनर कोसळला; महिलेला किरकोळ दुखापत

नवी मुंबई येथील खारघर परिसरात सुरू असलेल्या ‘हिंद की चादर’ कार्यक्रमादरम्यान मैदानाजवळ लावलेला एक पोस्टर अचानक कोसळला. या घटनेत तेथे उभी असलेली एक महिला बॅनरखाली अडकली.

घटनेनंतर कार्यक्रमस्थळी तैनात सुरक्षारक्षकांनी तात्काळ मदत व बचावकार्य सुरू केले. त्यांनी बॅनर बाजूला करून महिलेला सुरक्षित बाहेर काढले. महिलेला किरकोळ दुखापत झाली असून तिला घटनास्थळीच प्राथमिक उपचार देण्यात आले.

अमरावती महानगरपालिकेमध्ये स्वच्छतेच्या मुद्द्यावर 9 तास सलग चर्चा

अमरावती शहरातील वाढलेली अस्वच्छता या विषयावर आज विशेष आमसभेचे केलं होतं आयोजन

स्वच्छतेच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांमध्ये सलग नऊ तास चर्चा

अमरावती महानगरपालिकेमध्ये वाढलेली अस्वच्छता नियमित कचऱ्याची साफसफाई होत नाही या विषयावर सभागृहातील सर्व नगरसेवक आक्रमक

आता सभागृह नेते चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतेखालील स्वच्छतेच्या मुद्द्यावर अभ्यास समिती गठीत होणार

चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात हत्तीचा धुडगूस

उमगाव जवळच्या खळणेकरवाडीत हत्तीकडून वाहनाची तोडफोड

शेतकरी आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

गाडी हवेत उडवत हत्तीने भिरकावून दिली

हत्तीच्या हल्ल्यात चार चाकी सह तीन दुचाकींचे नुकसान

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन केला पंचनामा

रात्रीच्या वेळी शिवारात न जाण्याच वनविभागाच आवाहन

बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरण; चौघा महिला आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बदलापूर स्त्रीबीज तस्करीप्रकरणी चारही महिला आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.. तर फार्मासिस्ट सुमित सोनकांबळेला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. या प्रकरणात आणखी दोन जणांना लवकरच अटक होईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय.

पुण्यात वाघोलीत इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली.

ही घटना दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास भावडी रोड वरील एका सोसायटी मध्ये घडली.

Maharashtra Live News Update: मुंबई महापालिकेचा कोट्यवधींचा आरोग्य अर्थसंकल्प… 

सायन रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक २० मध्ये एका बेडवर तीन-तीन रुग्णांना ठेवून उपचार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

अजित दादांचे विमानाच्या अपघातानंतर अनेक नेत्यांची मतमतांतर होते - उदय सामंत 

राज्यातील ५ विमानतळ यांचा मेट्रिक योग्य होत नसल्याने आम्ही त्या कंपनीकडून काढून घेतली होती. ⁠या विमानतळात बारामतीचंही विमानतळ होती. ⁠मी त्या विभागाचा मंत्री असल्याने काढून घेत महाराष्ट्र प्राधिकरणाकड् दिले. भविष्यात अजित पवारांची जी इच्छा होती, राज्यातील प्रमुख विमानतळ यांच्या सुविधांचा आढावा घेणार मी पुढाकार घेईन

Maharashtra Live News Update: ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डाटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब, अहवालातून समोर

अजितदादांच्या अपघाताचा अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये फ्लाईट डाटा रेकॉर्डर, उष्णतेमुळे खराब झाल्याची बातमी समोर आली आहे.

धुळे बाजार समितीत कांद्याची माती, कवडीमोल दराने शेतकरी हवालदिल, शासनाच्या ठोस निर्णयाची मागणी 

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर अक्षरशः कोसळले असून, कांद्याला केवळ 500 ते 700 रुपयांचा कवडीमोल भाव मिळत आहे, ऐन हंगामात कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च तर दूरच, पण साधा लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे.

चाकणमध्ये कंपनी गोडाऊनमध्ये जुगार अड्ड्यावर धाड; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

चाकण औद्योगिक क्षेत्रातील पिंपरी बुद्रुक येथे कंपनीच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अलिशान जुगार अड्ड्यावर राजगुरुनगर पोलिसांनी धाड टाकली. औद्योगिक कामासाठी उभारलेल्या गोडाऊनमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली. ३६ वाहनांवर कारवाई करत आलिशान मोटारी व दुचाकी जप्त करण्यात आल्या. कोट्यवधींचा मुद्देमाल, रोख रक्कम आणि जुगार साहित्य हस्तगत करण्यात आले. पोलिसांची चाहूल लागताच जुगारी व अड्डा चालक फरार झाले असून राजकीय वरदहस्ताबाबत चर्चा रंगली आहे.

कोल्हापूरच्या चंदगड पश्चिम भागात हत्तीचा धुमाकूळ; वाहनांची तोडफोड

चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात हत्तीचा धुमाकूळ

उमगाव जवळच्या खळणेकरवाडीत हत्तीकडून वाहनाची तोडफोड

शेतकरी आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

गाडी हवेत उडवत हत्तीने भिरकावून दिली

हत्तीच्या हल्ल्यात चार चाकी सह तीन दुचाकींचे नुकसान

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन केला पंचनामा

रात्रीच्या वेळी शिवारात न जाण्याच वनविभागाच आवाहन

सिडको भरती प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप

सिडकोच्या भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. उच्च गुणवताधारक आणि पात्र उमेदवारांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.

नांदेड पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन स्थगित

नांदेड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन आज माघे घेण्यात आले. कामा वरुन कमी केलेल्या सफाई कामगारांना पुन्हा सेवेत रूजू करण्यात यावे , जे काम कामगार काम करत नाहीत त्यांना कामावरुन कमी करावे या मागणीसाठी काल पासून कंत्राटी सफाई कामगारांनी काम बंद केले होते.आज मोर्चा देखील कढण्यात येणार होता . मात्र कामगार संघटना आणि प्रशासना मध्ये झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आणि सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन माघे घेतले.

नागपूरमध्ये दुचाकीच्या अपघातानंतर वाहनचालकांमध्ये राडा

नागपूर

- दुचाकीच्या अपघातानंतर वाहनचालकांमध्ये राडा

- नागपुरातील मानस चौक परिसरात हा राडा झालाय

- दुचाकी स्वारांमध्ये ही हाणामारी झाली

- दुचाकीचा कट लागल्याने दुचाकी स्वरांनी एकमेकांना हेल्मेट ने मारहाण केली

- मात्र पोलीस कारवाई टाळण्यासाठी दोन्ही चालकांनी घटनास्थळावरून पळ काढला

- या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल झाला आहे

स्मार्ट मीटर वादावर तोडगा; वाढीव वीजबिलांसाठी हप्त्यांची सुविधा मंजूर

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ठिकाणी अव्वाच्या सव्वा वीजबिले आल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. वीज विभागाच्या यंत्रणेमधील त्रुटींमुळे काही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनाही समोर आल्या. या पार्श्वभूमीवर आमदार कैलास पाटील यांनी वाढीव वीजबिलांची दुरुस्ती करून ग्राहकांना बिलाची रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा द्यावी, अशी मागणी केली होती. ही मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत संबंधित विभागाला आवश्यक निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाढीव बिलांमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

परभणीतील मिर्झापूरमध्ये आरोग्य शिबिरातील गोळ्या खाऊन तब्येत बिघडली

परभणी जिल्ह्यातील मिर्झापूर गावात आयोजित आरोग्य शिबिरानंतर गावकऱ्यांची तब्येत बिघडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पिरामल स्वास्थ्य संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरात काही नागरिकांना गोळ्या देण्यात आल्या. या गोळ्या घेतल्यानंतर एका व्यक्तीला ऐकू येईनासे झाले, तर दुसऱ्याला दिसेनासे झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे.

घडलेल्या प्रकाराबाबत संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाणे आणि आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच शिबिरासाठी आलेल्या डॉक्टर व नर्सेस यांना जाब विचारत शिबिर बंद पाडण्यात आले. दरम्यान, आरोग्य विभागाने संबंधित गोळ्यांमुळे अशा प्रकारचे दुष्परिणाम होत नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. मात्र, संबंधित खाजगी संस्थेवर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

साताऱ्यातील दरोडा घालणाऱ्या आरोपींना अटक; 21 तोळे सोनेसह पाच जण जेरबंद

सातारा येथून दरोडा टाकून 21 तोळे सोने लंपास करणाऱ्या पाच जणांच्या शिरपूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळल्या. दरोडा टाकल्यानंतर आरोपी धुळे जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठांच्या आदेशानंतर शिरपूर पोलिसांनी टोल नाका परिसरात सापळा रचला.

मात्र पोलिसांची हालचाल लक्षात येताच चोरट्यांनी आपला मार्ग बदलून आडमार्गे पसार होण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत थरारक पाठलाग केला आणि पाचही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून 21 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिरपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू आहे.

सांगलीत कुस्तीपटूंचा इशारा; 'एकच महाराष्ट्र केसरी घ्या, अन्यथा गदा परत करू'

सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीपटूंनी राज्य सरकारला ठाम इशारा दिला आहे. “एक महाराष्ट्र, त्यामुळे एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे. अन्यथा राज्यातील महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी विजेते आपल्या गदा सरकारला परत करून मुंबईच्या आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू करतील,” असा इशारा देण्यात आला. या परिषदेला दिनानाथ सिंह आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उपस्थित होते.

कुस्ती संघटनांतील वादामुळे गेल्या काही वर्षांत दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहेत. यंदा हा वाद अधिक तीव्र झाल्याने चार स्पर्धा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढली आहे. राज्याची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी आणि खेळाडूंना न्याय मिळावा यासाठी सरकारने हस्तक्षेप करून एकच अधिकृत महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा आयोजित करावी, अशी मागणी कुस्तीपटूंनी केली आहे.

Breaking: कॉकपीट हाताळण्यासाठी अमेरिकेतून टीम भारतात येणार

कॉकपीट हाताळण्यासाठी अमेरिकेतून टीम भारतात येणार

अपघातामुळे विमानांमध्ये असणारा कॉकपीट आणि FDR झाला होता थर्मल डॅमेज

त्यातील डाटा सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेतून टीम भारतात येणार किंवा हे अमेरिकेत पाठवलं जाणार याबाबत निर्णय घेतला जाणार

विश्वसनीय सूत्रांची साम टीव्हीला माहिती

Jalna: जालना जिल्हा प्रशासनाचा संभाव्य पाणी टंचाईचा आराखडा तयार

जालना -

जिल्हा प्रशासनाचा संभाव्य पाणी टंचाईचा आराखडा तयार, जाफ्राबाद तालुक्यात सर्वाधिक टंचाई ग्रस्त गावे

एप्रिल आणि मे महिन्यात जालना जिल्ह्यात जवळ पास 200 टँकर लागण्याची शक्यता

टँकरचे टेंडर प्रसिद्ध तर कंत्राटदार निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती

फेब्रुवारी ते जून महिन्यापर्यंत जालना जिल्ह्यातल्या 562 गावे आणि 138 वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता

Mumbai: इंडिगोकडून इराण हवाई क्षेत्राबाबत ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी

इंडिगोकडून इराण हवाई क्षेत्राबाबत ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी

इराण आणि त्याच्या हवाई क्षेत्रातील घडामोडींवर विमान कंपनीचे बारकाईने लक्ष

प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य असल्याचे इंडिगोचे स्पष्ट मत

परिस्थितीनुसार उड्डाण वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता

प्रवाशांनी प्रवासापूर्वी फ्लाइट स्टेटस तपासण्याचे आवाहन

कोणताही बदल झाल्यास नोंदणीकृत मोबाईल व ई-मेलवर तात्काळ माहिती

परिस्थितीनुसार आवश्यक ती सर्व मदत देण्याची कंपनीची तयारी

Shirdi: 3 मार्चला खग्रास चंद्रग्रहण काळात साईदर्शन राहणार बंद

3 मार्चला खग्रास चंद्रग्रहण काळात साईदर्शन राहणार बंद

3 मार्च रोजी खग्रास चंद्रगहण असल्याने ग्रहणकाळात साईदर्शन बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानच्या वतीने घेण्यात आलाय.

खग्रास चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरू होवून 6 वाजून 48 मिनिटांनी संपणार आहे.

या काळात भाविकांसाठी साईदर्शन बंद ठेवण्यात येणार असुन साई समाधीवर दुर्वा, तुळशीपत्र यांचे आच्छादन ठेवून मंत्रोच्चार सुरू राहणार आहे.

ग्रहण कालावधी संपल्यानंतर साईबाबांचे मंगलस्नान पार पडेल आणि धुपारती झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन पूर्ववत सुरू होईल.

त्यामुळे भाविकांनी 3 मार्च रोजी दर्शनासाठी येताना त्याप्रकारचे नियोजन करूनच यावे असे आवाहन साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे..

Mumbai: दिंडोशीमध्ये पोलिस अधिकाऱ्याची मुजोरी, आरे स्टॉलची तोडफोड करत सामान बाहेर फेकले

मुंबई -

दिंडोशीमध्ये पोलिस अधिकाऱ्याची मुजोरी

आरे स्टॉलची तोडफोड करत सामान बाहेर फेकले

पोलिस निरीक्षक महेंद्र शिंदेंवर गंभीर आरोप

काल रात्री झालेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर

आरे स्टॉलमधील कामगाराला मारहाण केल्याचा आरोप

पोलिसांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणी दिला?

गृह विभागाने दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी

मराठी स्टॉल चालकाची सरकारकडे मागणी

Malegaon: मालेगाव महापालिका नमाज पठण प्रकरण, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

मालेगाव -

- मालेगाव महापालिका नमाज पठण प्रकरण

- आता नमाज पठण केल्याचा गुन्हा दाखल नंतर आता हनुमान चालिसा पठण करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल

- मालेगावात नमाज पठण प्रकरणात नमाज पठण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल नंतर नमाज पठण केल्याचा निषेधार्थ मालेगाव मालेगाव महापालिका आयुक्त कार्यालयात हनुमान चालिसा पठण करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर मालेगाव किल्ला पोलिसात गुन्हा दाखल

Jalgaon: मेहरून तलावाच्या स्वरक्षणासाठी आजपासून आमरण उपोषण

जळगाव -

मेहरून तलावाच्या स्वरक्षणासाठी आंदोलन, आजपासून आमरण उपोषण

खराब सांडपाण्यामुळे शहराचा वैभव असलेला मेहरूण तलाव धोक्यात

मेहरूण तलाव येथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य

पुण्यात नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू

पुण्याच्या भोर तालुक्यातील हातावे बुद्रुक येथे,नदी पात्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घडली घटना

गजानन नामदेव केंद्रे असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव

मालती IVF सेंटरला नाशिक महानगरपालिकेची कारणे दाखवा नोटीस

- मालती IVF सेंटरला नाशिक महानगरपालिकेची कारणे दाखवा नोटीस

- ठाण्यातील स्त्रीबीज प्रकरणाचे नाशिक कनेक्शन उघड

- नाशिक महानगरपालिकेने नाशिक शहरात IVF सेंटर चालवण्याची परवानगी दिलेली असताना,नाशिकच्या प्रमाणपत्रावर ठाण्यामध्ये बेकायदेशीरपणे IVF सेंटर चालवलं जात असल्याचा ठपका

- मालती IVF सेंटरचे डॉ अमोल पाटील आणि वंदना पाटील यांना 3 दिवसात खुलासा करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस

- समाधानकारक खुलासा न झाल्यास सरोगसी (नियमन) कायदा २०२१ अन्वये कारवाईचा इशारा.

Chembur Accident : मुंबईत आठव्या मजल्यावरून ६ कामगार पडले

चेंबूरच्या सुभाष नगर भागात धक्कादायक घटना

- इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून पडले 6 कामगार

- त्यातील एक जण मृत तर बाकीचे गंभीर जखमी

- कामगारांनी सेफ्टी किट न वापरल्याची माहिती

- इमारतीच्या बांधकामावेळेस झाला अपघात

- कामगारांना राजावाडी रुग्णालयात केलं दाखल

डोंगरगाव येथील शेतकऱ्याचा अज्ञाताने दहा एकर वरील ऊस जाळला

नांदेड जिल्हयातील बिलोली तालुक्यातील डोंगरगाव येथील एका शेतकर्यांचा दहा एकर मधील ऊस जाळण्यात आल्याचा आरोप आहे. सुरेश पेरके यांच्या नावाने दहा एकर शेती असून यात ऊस हे पिक घेतले होते.अज्ञाताने या उभ्या असलेल्या ऊसाला आग लावली असा आरोप करण्यात आला. ऊसाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पाईप यासह शेतातील अवजारे देखील या आगीत जळाली.शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून ऊस जाळण्यात आल्याचा आरोप आहे.

पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापतीच्या निवड ९ मार्चला होणार

पंचायत समिती सभापती,उपसभापती निवडणूक कार्यक्रम कार्यक्रम जाहीर

९ मार्च दुपारी २ दोन वाजता निवडणूक कार्यक्रम

पिठासीन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी पाहणार निवडणुकीचा कार्यक्रम.

जिल्ह्यातील १३ पंचायत समितीच्या सभापती,उपसभापतीची निवड होणार.

जिल्ह्यात पंचायत समितीच्या एकूण १४६ जागा आहेत.त्यापैकी सर्वात जास्त जागा ९० राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला मिळाले आहेत. त्यानंतर भाजपाला २८,शिवसेना शिंदे गटाला १२,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला ४,तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला १०, अपक्ष दोन असं पंचायत समिती मधील जिल्ह्यातील चित्र आहे..

नरेंद्र मोदी आणि अमित शहांना केजरीवालांची माफी मागावी लागेल - संजय राऊत

धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपाच्या अर्चना पाटील अध्यक्ष होणार?

धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपाच्या अर्चना पाटील अध्यक्ष होणार..?

भाजप कार्यकर्त्यांकडुन धाराशिव मध्ये बॅनरबाजी

जिल्हा परिषद अध्यक्ष वहीनी साहेब,भाजप कार्यकर्त्यांनी लावले बॅनर

धाराशिव जिल्हा परिषदेत 19 सदस्यांसह भाजप सर्वात मोठा पक्ष

शिवसेनेचे धाराशिव जिल्हा परिषदेत 15 सदस्य

शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा अर्चना पाटील यांच्या अध्यक्ष पदाला विरोध तर शिवसेनेचा एक गट भाजपसोबत

भाजपासह इतर सर्व सदस्य आहेत सहलीवर

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर,जिल्हाधिकाऱ्यांनी 13 मार्च ला बोलावली बैठक

अर्चना पाटील यांचीच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी वर्णी लागणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

नाशिकच्या संदीप फाउंडेशनमध्ये सामूहिक नमाज पठण केल्याचा दावा

नाशिकच्या संदीप फाउंडेशनमध्ये सामूहिक नमाज पठण केल्याचा दावा

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सामूहिक नमाज पठणावर घेतला आक्षेप

संदीप फाउंडेशनमध्ये हिंदू सणांना बंदी मात्र मुस्लिम सणांना परवानगी कशी ? उपस्थित केला सवाल

प्रशासनाने गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

हिंदुत्ववादी कार्यकर्ते निषेध करण्यासाठी संदीप फाउंडेशन येथे सामूहिक हनुमान चालीसा म्हणणार

सामूहिक नमाज पठणावर आक्षेप घेतल्यानंतर काय कारवाई होणार? याकडं लक्ष

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीला होणार रवाना

आज दुपार नंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीला होणार रवाना

उद्या दिवसभर असणार बारामतीत

आज दुपारी पुण्यात येणार आणि त्या नंतर बारामतीला होणार रवाना

सुनेत्रा पवार अधिवेशनानंतर घेणार दर आठवड्याला बैठका

भाजपकडून अरविंद केजरीवाल यांची बदनामी - संजय राऊत

कापूस वेचायला गेलेल्या शेतमजूर महिलेवर वाघाचा हल्ला

शेतात कापूस वेचायला गेलेल्या शेतमजूर महिलेवर वाघाने हल्ला केला. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील आदर्श खेडा गावातील शेतशिवारातील ही घटना असून, सुनीता शामराव भोयर (४५) असे मृतक मजूर महिलेचं नाव आहे. या घटनेने गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले; परंतु वनविभागाचे एकही अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. मागील दोन दिवसात जिल्ह्यात ही दुसरी घटना आहे.

चिखला काकड पुतळा वादाचा शाळेवर परिणाम; विद्यार्थ्यांची उपस्थिती निम्म्यावर..

लोणार तालुक्यातील चिखला गावात पुतळा वादानंतर परिस्थिती हळूहळू निवळत असली तरी त्याचा परिणाम स्थानिक जिल्हा परिषद शाळेवर दिसून येत आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती निम्म्यावर आली आहे.

गावात 2 मार्चपर्यंत जमाबंदी लागू करण्यात आली असून, दोन्ही गटांच्या तक्रारींवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. जनजीवन सुरळीत होत असतानाही पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने अनेक विद्यार्थी शाळेत येत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, परीक्षा तोंडावर आल्याने शिक्षकांनी पालकांना विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठवण्याचे आवाहन केले आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघातचा प्राथमिक अहवाल आज येणार

डीजीसीए कडून प्राथमिक अहवाल आज सादर करण्यात येणार

अजित पवार यांच्या विमान अपघात घातपात असल्याचा आरौप होत असल्याने अहवाल काय यांची प्रतीक्षा

आज अहवाल येणार असल्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांची माहिती

बदलापूर येथील कथित स्त्री बीज तस्करी रॅकेटचे धागेदोरे नाशिकपर्यंत

- नाशिक महापालिकेकडून मुंबई नाका परिसरातील मालती आयव्हिएफ सेंटरची तपासणी

- संबंधित कागदपत्रे ताब्यात घेत लेखी खुलासा करण्यासाठी बजावली नोटीस

- एका महिलेचा अनेकवेळा बीज दान आणि लाखो रुपयांना तो विक्री केल्याचा आहे संशय

- सखोल चौकशीनंतर पुढील कारवाई काय होते याकडं लक्ष

यवतमाळच्या नेर येथील शासकीय वस्तीगृहात निकृष्ट तुपाचा धक्कादायक प्रकार आला समोर,विद्यार्थ्यांकडून होत आहे संताप व्यक्त

नेर येथील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वस्तीगृहात एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निकृष्ट व भेसळयुक्त तूप पुरविण्यात आल्याचा प्रकार विद्यार्थ्यांनी आणला उघडकीस

विद्यार्थ्यांनीच पुढे येत ही बाब आणली समोर

तुपाची चव, वास आणि दर्जा संशयास्पद असल्याची तक्रार वारंवार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती विद्यार्थ्याकडून तक्रारी विद्यार्थ्यांनी दिली माहिती

या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

अन्ननमुने तपासणीसाठी पाठवावेत विद्यार्थ्यांची मागणी

जानेफळमध्ये डीपीला भीषण आग; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचे मोठे नुकसान..

बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथे महावितरणच्या डीपीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आठवडी बाजाराच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रोड क्रॉस वीजवाहिनीला जड वाहनाचा धक्का लागून शॉर्टसर्किट झाल्याने डीपी पेटली आणि केबल व फ्युज बॉक्स जळून खाक झाले... सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, उपकेंद्रातील अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.

खामगावच्या घाटपुरी शिवारात बिबट्याचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट...

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घाटपुरी शिवारात आज सकाळी बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शेतकरी सोपान चोपडे यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांसमोर अचानक बिबट्या आल्याने एकच गोंधळ उडाला. मजुरांच्या आरडाओरडीनंतर बिबट्या जवळच दबा धरून बसल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेतल्या जात आहे, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे...

पालघरमध्ये २ जणांचा मृत्यू

पालघर - बंद दगड खाणीतील पाण्यात पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू . पालघरच्या मनोर जवळील टाकवहळ येथील दुर्दैवी घटना . संध्याकाळच्या सुमारास अंघोळीसाठी गेलेल्या जिग्नेश विजय पवार वय वर्ष 8 आणि आयुष मुकेश पवार वय वर्ष 15 यांचा दुर्दैवी मृत्यू . पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मृत्यू झाल्याची माहिती . दोन्ही मुलं मध्य प्रदेशातील इंदूर येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती . एकाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश तर दुसरा मृतदेह शोधण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू.

सातारा शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करावा; शहर भाजपाची पोलिस अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

सातारा शहर आणि उपनगर परिसरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पसरणारी दहशत याचा बिमोड करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कडून सातारा शहर पोलीस आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरातील विविध परिसरात काही टवाळखोर तरुण उघडपणे कोयते आणि इतर घातक शस्त्र यांचा वापर करून दहशत माजविण्याचे प्रयत्न करत आहेत. या गुंडांच्या दहशतीमुळे महिला आणि विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून यामुळे शहरामध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी अशा टवाळखोरांवर कठोर कारवाई करून सातारा शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करावा, अशी मागणी भाजपकडून निवेदनाद्वारे पोलीस अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

- दोन वेगवेगळ्या कारवाईत तब्बल 1,251 किलो गांजा जप्त, डीआरआयची नागपूर कार्यालयाची कारवाई

- जप्त करण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत सुमारे 6 कोटी 25 लाख रुपये एवढी आहे...

- ओडिशा ते मध्य भारत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, म्होरक्यासह चौघांना केली अटक

- आंध्र प्रदेशवरून मध्य प्रदेशाच्या सीमेवर जाणाऱ्या एका बोलेरो वाहनातून 729 किलो गांजा जप्त, हा गांजा आल्यामध्ये लपवून ठेवला होता

- तर भागीमहारी पथकर नाक्यावर ओडीशा मधून आलेल्या एका ट्रक मधून 522 किलो गांजा डीआरआय केला जप्त

जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर गावात दगफेकीनंतर मोठा तणावं.

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर गावात बुऱ्हानपूर तालुक्यातील हेला पाणी या गावातील जवळपास 100 च्या वर जमावाने येऊन दगडफेक केली व काही घरांची तोडफोड केली यामुळे या गावात मोठा तणाव निर्माण झाला आहे तात्काळ जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उमापूर येथील आदिवासी समाजाच्या एका गटातील (कोरकू )तरुणाने बुरानपुर तालुक्यातील हेलापाणी येथील आदिवासी समाजाच्या दुसऱ्या गटातील तरुणीशी (भिलाला )चार दिवसापूर्वी पुणे येथे विवाह केला. यावरून वाद होऊन हेलापाणी येथील मुलीकडच्या गटातील लोकांनी येऊन उमापूर गावात मोठा गोंधळ घातला. यावेळी दगडफेकही झाली व अनेक घरांची तोडफोड ही करण्यात आली . जळगाव जामोद पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी उमापूर गावात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र गावात मोठा तणाव असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवला आहे विशेष म्हणजे या गावचा आज होळीनिमित्त भोगऱ्या बाजार देखील होता त्यामुळे गावात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव जमा झाले होते. दगडफेकीत व तोडफोडीत काहीजण जखमी झाल्याची ही प्राथमिक माहिती आहे.

मसुचीवाडीत कोल्ह्याचा थरार! भरदिवसा सात जणांवर हल्ला,गावात दहशतीचे वातावरण 

सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या मसुचीवाडी येथे कोल्ह्याची दहशत निर्माण झाली आहे.भर दिवसा कोल्ह्याने गावातल्या सात जणांवर हल्ला चढत जखमी केल्याच घटना घडली आहे. एका महिलेचा सात जणांवर हल्ला चढवत चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे,एका मागून एक अशा पद्धतीने या कोल्ह्याने ग्रामस्थांना लक्ष केलय जखमींना तातडीने ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे,या घटनेनंतर गावात भीतीच वातावरण पसरला असून ग्रामस्थांकडून कोल्ह्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे,मात्र कोल्ह्याच्या या हल्ल्याच्या घटनेने गावात कोल्ह्याची दहशत निर्माण झाली आहे.

- नाशिकच्या ओझर विमानतळावर हवाई सुंदरीची तब्येत बिघडल्याने बंगळुरू विमानाला ५ तासांचा विलंब

- नाशिकच्या ओझर विमानतळावर हवाई सुंदरीची तब्येत बिघडल्याने बंगळुरू विमानाला ५ तासांचा विलंब

- उड्डाणापूर्वीच हा प्रकार घडल्याने झाला होता गोंधळ

- मेडिकल इमर्जन्सी जाहीर करत प्रवाशांना पुन्हा टर्मिनलमध्ये परत आणण्यात आले

- हवाई सुंदरीवर उपचार करत आराम दिल्यानंतर तब्बल ५ तासांनंतर बंगळुरूकडे विमान झेपावले

- मात्र उड्डाणासंबंधी स्पष्ट माहिती मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये झाला होता गोंधळ

बदलापूरच्या 'त्या' स्कुल बसवर आरटीओची कारवाई

बदलापुरात एका स्कुल बस चालकानं 12 वर्षीय विद्यार्थिनीचा स्कुल बसमध्ये विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरटीओच्या पाहणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

ज्या स्कुल बसमध्ये हा प्रकार घडला, त्या बसचं फिटनेस, इन्शुरन्स आणि परमिट संपल्याचं उघड झालंय. त्यामुळं ही टेम्पो ट्रॅव्हलर बस अनधिकृतपणे स्कुल बस म्हणून चालवली जात असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं आरटीओकडून या अवैध स्कुल बसवर सुमारे 20 हजार रुपयांचा दंड लावण्यात आलाय. तसंच या स्कुल बसचं आरसी रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येणार असून आरोपी बसचालक जयेश मुने याचं ड्रायव्हिंग लायसन्स देखील रद्द केलं जाणार असल्याची माहिती कल्याण आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक चैतन्य बकरे यांनी दिली आहे. तसंच अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये आता अवैध स्कुल बस आणि स्कुल व्हॅनवर कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.

बारावीच्या परिक्षेवेळी भोंगा लावून प्रश्नांची उत्तर सांगितल्याचा प्रकार

नांदेडच्या किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथील एका परिक्षा केंद्राजवळ अज्ञात व्यक्तीने भोंगा लावून प्रश्नांची उत्तर सांगीतल्याची तक्रार केन्द्र प्रमुखाने पोलिस ठाण्यात केली आहे.दहेली तांडा येथे स्वर्गीय संगीतादेवी आश्रम शाळेत बारावी परीक्षा सुरु आहे.25 फेब्रुवारी रोजी परीक्षा केंद्राच्या बाजूला असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर कोणीतरी भोंगा लावला आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तर त्या भोंग्यातून सांगतली अशी तक्रार केन्द्र प्रमुख सुबोध थोरात यांनी केली.त्यावरुन सिंदखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील एमआरआय सेंटर सुरू होईना,आरोग्य विभागाच्या दिरंगाईचा रुग्णांना फटका

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य विभागाने अद्यावत एमआरआय सेंटर उभारले आहे.मात्र मागील आठ महिन्यांपासून आरोग्य संचालनालयाची परवानगी न मिळाल्याने हे एमआरआय सेंटर धुळखात पडले आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेले एमआरआय सेंटर असताना देखील रुग्णांना खाजगी एमआरआय सेंटरचा आधार घ्यावा लागत आहे. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अद्ययावत एमआरआय सेंटर उभारले आहे. मात्र हे एमआरआय सेंटर सुरू करण्यासाठी आरोग्य संचालनाची परवानगी आवश्यक असल्याने गेल्या आठ महिन्यांपासून हे एमआरआय सेंटर परवानगी अभावी कुलूप बंद अवस्थेत आहे.

विधानसभेत डान्सबार प्रकरण तापलं! सत्ताधारी पक्षाचे आमदार सुभाष देशमुखांचा पोलिस आणि सरकारी यंत्रणेवर हल्लाबोल

भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात दक्षिण सोलापूर मतदारसंघात पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैध डान्सबार सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे.सोरेगाव ते मंद्रूप दरम्यानचे पुरावे आणि व्हिडिओ क्लिप पोलिस आयुक्तांना दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.पाहणी होऊनही कारवाई न झाल्याने संशय व्यक्त केला आहे.

मद्यधुंद ऑटो रिक्षा चालकाचा भर रस्त्यात राडा

पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौक येथे काल रात्री एका मध्य धुंद आटो रिक्षा चालकाने भर रस्त्यात ऑटो रिक्षा आडवी लावून राडा घातला आहे. डांगे चौक येथील महाराजा हॉटेल समोर जवळपास अर्धा तास ह्या ऑटो रिक्षा चालकाने राडा घातल्याने त्या ठिकाणी रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. आता ह्या मध्य धुंद ऑटो रिक्षा चालकावर पिंपरी चिंचवड शहर वाहतूक पोलीस नेमकी काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ झाली

शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सातत्याने घटत असलेल्या किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ झाली.

परिणामी पहाटेचा गारवा कमी झाला असून, आज दिवसभरात कमाल तापमानातही वाढ झाल्यामुळे दुपारचा उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता.

लोहगाव येथे सर्वाधिक ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

जिल्ह्यातील शिरूर, कुरवंडे यासह एनडीए आणि हवेली परिसरात गेल्या २४ तासांत किमान तापमान ८ अंशापर्यंत खाली आल्यामुळे पहाटेचा गारवा वाढला होता.

मागील आठवड्यात शहरासह जिल्ह्यात ऊन, ढगाळ वातावरण आणि गारवा असा हवामानाचा लपंडाव सुरू आहे.

"हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त प्रशासनाची जोरात तयारी

शिखांचे नववे गुरु, "हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली. नवी मुंबईतील सेंटर पार्क इथे हा कार्यक्रम भव्यदिव्य असा होताना दिसणार आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस इतर राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणारे त्यामुळे प्रशासनाचे दृष्टीने जयत तयारी करण्यात आलेले आहे

नवापूर तालुक्यातील गंगापूर हत्याप्रकरणी पोलिसांची तातडीची कारवाई करत काही तासांत संशयित ताब्यात

नवापूर तालुक्यातील गंगापूर परिसरात 55 वर्षीय महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. 24 फेब्रुवारी रोजी घरातून बाहेर पडलेली महिला रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेत विसरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी सखोल तपास सुरू करत गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत 25 वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली. हा आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com