Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या, मुंढवा पुलावरुन मारली उडी; पुण्यात खळबळ

Pune Mundhwa Crime News: पुण्यातील मुंढवा पुलावरुन एका २२ वर्षीय तरुणीने उडी मारली आहे. मानसिक तणावातून या तरुणीने आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे.

Siddhi Hande

पुण्यात २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या

मुंढवा येथील पुलावरुन मारली उडी

मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची शक्यता

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील मुंढवा येथे एका तरुणीने आत्महत्या केली आहे. मुंढवा येथील पुलावरुन २२ वर्षीय तरुणीने उडी मारली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मंगळवारी दुपारी या तरुणीने पुलावरुन उडी मारली. या घटनेनंतर बुधवारी दुपारी अग्निशामकलचे जवान व जीव रक्षकांनी अथक प्रयत्न केल्यानंतर तिचा मृतदेह सापडला. याप्रकरणी खराडे पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू दिनांक करण्यात आली आहे.

निकिता अष्टेकर असं मृत तरुणीचे नाव आहे. ती मूळची सोलापूरच्या म्हाडा येथील आहे. निकिता ही येरवडा येथील एका कॉल सेंटरमध्ये कार्यरत होती.मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ती मुंढवा येथील नवीन पुलावर आली. त्यानंतर तिने पुलाच्या कठड्यावर मोबाईल आणि पर्स ठेवून नदीत उडी मारली. ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ नदीत उडी मारुन तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

निकिता गेल्या अनेक महिन्यांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली. याच मानसिक तणावातून निकिताने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुण्यात २२ वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. पुण्यात चंदनगर परिसरातदेखील एकूण २२ वर्षीय तरुणीवर हल्ला करण्यात आला आहे. प्रियकरानेच प्रेयसीवर हल्ला केला असून यात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. प्रेयसीचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरल्याने प्रियकराने हे पाऊल उचलले. त्याने तिच्यावर टाकूने वार केले. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

ज्ञानेश कुमारांकडून भाजपच्या तिकीटाची ऑफर; केरळच्या माजी सचिवांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT