Mumbai Pod Taxi Saam Tv
मुंबई/पुणे

Pod Taxi: कुर्ला- वांद्रेमधील गर्दीची झंझट संपणार, पॉड टॅक्सीने थेट रेल्वे स्टेशनवर जाता येणार, MMRDA चा मास्टारप्लान काय?

Bandra- Kurla Complex: मुंबईतील बीकेसीमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. पॉड टॅक्सीने थेट कुर्ला आणि वांद्रे रेल्वे स्टेशनवर जाता येणार आहे. यासाठी एमएमआरडीए स्कायवॉक करणार आहे.

Priya More

वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्समधील वाहतूक कोंडीमुळे मुंबईकर चांगलेच हैराण झाले आहेत. या वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजेच एमएमआरडीएने पॉड टॅक्सी प्रोजेक्ट हाती घेतला आहे. कुर्ला रेल्वे स्टेशनला पॉड टॅक्सी स्टँडशी जोडणारा स्कायवॉक बांधला जाणार आहे. त्यासाठी योजना आखली जात आहे.

कुर्ला स्टेशन ते बीकेसीला जोडणारा स्कायवॉक तयार झाल्यावर कुर्ला ते बीकेसी आणि पुढे वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकापर्यंत प्रवाशांची वाहतूक सुलभ होईल आणि त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. याचसोबत कुर्ला स्टेशनपासून ते वांद्रे रेल्वे स्थानकापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढेल. बीकेसी परिसरात येणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे मोठी वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी लक्षात घेता एमएमआरडीएने स्कायवॉकची निर्मिती करण्याचे ठरवले आहे.

एमएमआरडीएकडून याठिकाणची वाहतूक कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे कुर्ला रेल्वे स्टेशन ते वांद्रे पूर्व स्टेशनपर्यंत ८.८ किमीचा पॉड टॅक्सी कॉरिडॉर तयार केला जाणार आहे.

या प्रोजेक्टसाठी १,०१६.३८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलवर राबविला जाईल. हे कंत्राट मेसर्स साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स अल्ट्रा पीआरटी यांना देण्यात आले आहे. जे बांधकाम आणि ऑपरेशन दोन्ही कामं करतील. पॉड टॅक्सी ३० वर्षांच्या कालावधीसाठी धावतील. या पॉड टॅक्सीचे भाडे प्रति किमी २१ रुपये असणार आहे.

एमएमआरडीए आता कुर्ला स्टेशन ते पॉड टॅक्सी टर्मिनलपर्यंत सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या स्कायवॉकसाठी सविस्तर प्रस्ताव तयार केला जात आहे. रेल्वेने या स्कायवॉकसाठी १,३७० चौरस मीटर जागा वाटप केली आहे. लांबी, रचना आणि खर्च यासारख्या तपशीलांना सध्या अंतिम स्वरूप देण्यात येत आहे आणि ते प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत शिंदे गटाला मोठा धक्का; कोकणातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार

November Travel: नोव्हेंबरमध्ये पिकनिक प्लॅन करताय? मग 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Thursday Horoscope: काहींना प्रवासातून लाभ, काहींना पैशांची तंगी जाणवणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Natural Hair Care: केस खूप गळतायेत? मग घरच्या घरी बनवा नैसर्गिक हा हेयर मास्क, मिळवा चमकदार केस

SCROLL FOR NEXT