Kalyan News
Kalyan NewsSaam tv

Traffic Police : वाहतूक विभागाचा पोलिसांनांच शिस्तीचा धडा; नो पार्किंग मध्ये उभ्या पोलिसांच्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Kalyan News : बेशिस्त रिक्षावाले, मोठी वाहने त्याच प्रमाणे दुचाकी बेशिस्तपणे पार्किंग करणारे महारथी यामुळे नेहमीच हा परिसर वाहतूक कोंडीचा विळख्यात असतो. यात पोलीस कर्मचारी देखील बेशिस्तपणे वाहने उभी करतात
Published on

संघर्ष गांगुर्डे 
कल्याण
: असे म्हटले जाते की कुठलेही काम करताना आपल्या घरापासून सुरुवात करावी याचा प्रत्यय कल्याण वाहतुक विभागाच्या कारवाईत दिसून आला आहे. शिवाय पोलिसांना नियम नसतात का? असा प्रश्न नेहमीच उपस्थित करत नियम मोडणाऱ्या पोलिसांवर कारवाई का नाही? असे म्हटले जात असते. मात्र कल्याण वाहतूक विभागाने नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या पोलिसांच्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करत शिस्तीचा धडा दिला आहे. 

कल्याण स्थानक परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या असते. यामुळे वाहनधारक त्रस्त होत असतो. बेशिस्त रिक्षावाले, मोठी वाहने त्याच प्रमाणे दुचाकी बेशिस्तपणे पार्किंग करणारे महारथी यामुळे नेहमीच हा परिसर वाहतूक कोंडीचा विळख्यात असतो. यात भर म्हणजे या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांकडूनही दुचाकी बेशिस्तपणे पार्क केलेल्या असतात. त्यामुळे मोठी वाहतुक कोंडी होत असते. 

Kalyan News
Jalgaon Crime : कॉफी शॉपमध्ये पोलिसांची धाड; तरुण- तरुणी सापडले नको त्या अवस्थेत

पोलिसांच्या गाडीवर दंडात्मक कारवाई 

यावर जालीम उपाय करत कल्याण वाहतूक पोलिसांनी पोलिसांच्याच पार्क केलेल्या दुचाकी वाहनावर कारवाई करत चलन मारले आहे. स्टेशन परिसरात नो पार्किंग मध्ये उभ्या करण्यात आलेल्या पोलिसांच्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आता दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या पोलिसांना देखील वाहतूक विभागाकडे दंड भरावा लागणार आहे. 

Kalyan News
Bachchu Kadu : समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला; बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका

शिस्त लावण्याचा प्रयत्न 

यापूर्वी फक्त सामान्य नागरिकांच्या वाहनावर कारवाई होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. पण आता वाहतूक पोलिसांनी आपल्याच पोलीस खात्याला शिस्त लावन्याचा प्रयत्न वाखण्याजोगा आहे. यानंतर अशी कारवाई सुरू राहील अशी अपेक्षा वाहतूक पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. या कारवाईमुळे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com