सचिन कदम
रायगड : सरकारने लाडक्या बहिणीचे नाव बदनाम केले. पैशाच्या जोरावर मतं विकत घेण्याचा हा प्रकार सुरु आहे. समाजकल्याण विभागाचे पैसे लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आले असून प्रत्येक वेळी यांना समाज कल्याणचे पैसे दिसतात का ? असा सवाल करत प्रहारचे बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून बोलताना ते म्हणाले, कि सरकारने यात एक बदमाशी केली आहे. योजनेसाठीचे पैसे मागास लाडक्या बहिणींना दिले. आता बिहारमध्ये बहिणींच्या खात्यावर १० हजार रुपये टाकले. पाच वर्ष काही करायचं नाही आणि निवडणुका आल्या की पॅकेज द्यायचं हे सरकारचे धोरण आहे. पैशाच्या जोरावर मतं विकत घेण्याचा हा प्रकार असल्याचं बच्चू कडू म्हणाले.
पूरग्रस्तांसाठीच्या पॅकेज वरूनही साधला निशाणा
पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलेलं पॅकेज म्हणजे सरकारची बनवाबनवी असल्याची टीका प्रकारचे बच्चू कडू यांनी केली आहे. सरकारने आकडा ३१ हजार कोटींचा सांगितला. त्यातील १० हजार कोटी पायाभूत सुविधांचे आहेत. तर ५ हजार कोटी विम्याचे म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काचे आहेत. म्हणजे सरकारने जाहीर केलेले आकडे फसवे असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.
नुकसान होऊनही कमी मदत
अन्य राज्यातील सरकारने भावांतर योजना सुरू केली. हमी भाव आणि बाजार भावातील फरकाची रक्कम दिली. नुकसान झालेले नसताना तिथं एकरी 5 हजार दिले जातात. इथं नुकसान होऊनही एकरी ४ हजार दिले. श्रीमंत राष्ट्र अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राकडे शेतकरी, मच्छीमार यांना देण्यासाठी पैसे नाहीत हे खूप वाईट असल्याचं सांगत बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.