Mumbai News: मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगात होणार, वांद्रे-कुर्ला-चेंबूरमधील वाहतूक कोंडी कायमची संपणार, पाहा नेमका प्लान

Mumbai To get 2 New Tunnel: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईत आता आणखी दोन बोगदे सुरु केले जाणार आहे. एक बोगदा वांद्रा रिक्लेमेशन ते थेट एअरपोर्टला जोडला जाणार आहे. तर दुसरा बोगदा चेंबूर ते बुलेट ट्रेन बीकेसी स्टेशनला जोडला जाणार आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaam Tv
Published On
Summary

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबईला मिळणार २ नवीन बोगदो

वांद्रा-कुर्ला-चेंबुरची वाहतूक कोंडी फुटणार

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत आता आणखी दोन बोगदे होण्याची शक्यता आहे. एक बोगदा हा वांद्रा बुलेट ट्रेन स्थानकापासून ते एअरपोर्टला कनेक्ट केला जाईल. तर दुसरा बोगदा हा चेंबूर ते बीकेसी बुलेट ट्रेन स्टेशनला जोडला जाण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. बुलेट ट्रेनसाठी आणखी दोन बोगदे सुरु होण्याची शक्यता आहे.

Mumbai News
Bullet Train: मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? रेल्वे मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

२०२३ मध्ये राज्य सरकारने ८ सदस्यांची समिती स्थापन केली होती. बोगद्यांचं नेटवर्क तयार करण्यासाठी ही समिती स्थापन केली होती. यामुळे मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील प्रवास हा आणखी सुखकर होणार आहे. पुढच्या ३० वर्षांच्या दृष्टीने हे बोगदे तयार केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या वांद्रे रिक्लेमेशन येथे वाहतूक कोंडीची समस्या आहे. एसव्ही रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि बीकेसी परिसरात वाहतूक कोंडीची समस्या जास्त आहे. याचसोबत सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, केसी चुनाभट्टी कनेक्टर, ईस्टर्न एक्सप्रेस वेवरदेखील वाहतूक कोडींची समस्या आहेत. त्यामुळेच हा नवीन उपक्रम सरकार हाती घेण्याची शक्यता आहे,

Mumbai News
Mumbai Real Estate : मुंबईत घरांच्या किंमतीत मोठी कपात, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

नवीन बोगद्यांमुळे फायदा

या दोन नवीन बोगद्यांमुळे तुम्ही थेट फ्रिवेला बाहेर निघणार आहे. फ्रिवे हा अतल सेतूला जोडला गेला आहे.यामुळे प्रवाशांना थेट वर्सोवा-वांद्रा सी लिंक आणि वर्सोवा दहिसर कोस्टल रोडला कनेक्ट होता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. याचसोबत सुखकर प्रवास होणार आहे. यामुळे ईस्ट-वेस्ट कोरिडॉर जोडले जाणार आहे. प्रवाशांना फ्रिवे, अटल सेतू या मार्गावर जलद पोहचता होणार आहे.

Mumbai News
Vande Bharat Accident: दसरा रामलीला कार्यक्रमावरून परतताना काळाचा घाला, वंदे भारत ट्रेनने तिघांना चिरडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com