Mumbai Real Estate : मुंबईत घरांच्या किंमतीत मोठी कपात, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Mumbai Real Estate Home Price Drop: मुंबईत घर खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील घरांच्या किंमती ३ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
Mumbai Real Estate
Mumbai Real EstateSaam Tv
Published On
Summary

मुंबईत घर खरेदी करण्याची योग्य वेळ

मुंबईतील घरांच्या किंमती घसरल्या

घरांच्या किंमतीत ३ टक्क्यांनी घसरण

मुंबईत घर घ्यायचे हे मध्यमवर्गीयांना परवडणारे नाहीये. दरम्यान,जर तुम्ही मुंबईत घर खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी योग्य संधी आहे. एका बाजूला देशातील अनेक ठिकाणी घरांच्या किंमती वाढताना दिसत आहे तर मुंबई, नवी मुंबईत घरांच्या किंमती कमी होताना दिसत आहेत.ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटल यांनी याबाबत रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये आर्थिक वर्ष २०२५ मध्ये मुंबई आणि नवी मुंबईत घरांच्या किंमती कमी झाल्याचे दिसत आहेत. वर्षाला घरांच्या किंमती ३ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

Mumbai Real Estate
Konkan Mhada House : म्हाडाच्या घरांसाठी अर्जांचा पाऊस; सानपाड्यातील २ घरांसाठी तब्बल ६१५६ अर्ज, प्राइम लोकेशन आहे तरी कुठं?

या रिपोर्टनुसार, देशातील इतर ठिकाणांवरील घरांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. कोलकत्तामध्ये घरांच्या किंमती २९ टक्क्यांना वाढल्या आहेत. ठाण्यात घरांच्या किंमती १७ टक्क्यांनी तर बंगळुरुमध्ये घरांच्या किंमती १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा

मुंबई हे सर्वात जास्त महाग शहर आहे. मुंबईत घरांच्या किंमती सतत वाढत असतात. दरम्यान, यावर्षी घरांच्या किंमती ३ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ब्रोकरेजच्या रिपोर्टनुसार, घरांच्या किंमती घसरल्याने हे सर्वसामान्यांना परवडणाऱ्याजोगे झाले आहे. २०२४ मध्ये रिअल इस्टेट मार्केटमध्ये घरांची विक्रमी विक्री आणि मागणीदेखील जोरदास होती. परंतु आता मुंबईत घरांच्या किंमती स्थिर होताना दिसत आहे.

Mumbai Real Estate
Mumbai To Pawna Lake: वीकेंडसाठी प्लॅन करताय? मुंबईवरून पावना लेकला कसे पोहोचाल? वाचा सविस्तर माहिती आणि पर्याय

घर घेण्याची ही योग्य वेळ आहे का?

अहवालानुसार, २०२४ मध्ये घरांच्या किंमती चांगल्याच वाढल्या आहेत. त्यानंतर या किंमती स्थिर होण्याची अपेक्षा आहे. परंतु काही काळातच सततची मागणी आणि वाढत्या खर्चामुळे घरांच्या किंमती पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे घरांच्या किंमती काही कालावधीसाठीच कमी होई शकतात. त्यामुळे ही घर खरेदी करण्याची उत्तम संधी असल्याचे म्हटले आहे.

Mumbai Real Estate
Mumbai Local : धक्कादायक! लोकलमध्ये धक्काबुक्की, दारात उभ्या असणाऱ्या जवानाचा मृत्यू, मुंबई हादरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com