Mumbai Local : धक्कादायक! लोकलमध्ये धक्काबुक्की, दारात उभ्या असणाऱ्या जवानाचा मृत्यू, मुंबई हादरली

Malad goregaon Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या गर्दीने जवानाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकलच्या दारात उभं असणाऱ्या जवानाचा मृत्यू झाला आहे. कामावरून घरी परत जाताना काळाने घाला घातला.
Mumbai Local Train Accident News
Mumbai Local Train Accident News Saam TV Marathi News
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Local Train Accident News : गर्दीच्या रेट्यामुळे धावत्या लोकलमधून पडून महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गणेश जगदाळे (३१) असे मृत जवानाचे नाव असून ते दहिसर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ते ड्युटी संपवून दहिसर स्थानकातून नायगावला जाण्यासाठी लोकल पकडली. मात्र प्रचंड गर्दीमुळे ते दरवाज्याजवळ उभे असताना मालाड-गोरेगाव दरम्यान धक्का बुक्की झाली आणि ते रुळावर पडले. गंभीर दुखापतीमुळे त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Mumbai local train death due to rush hour crowd)

या अपघाताची नोंद बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. मुंबईत गर्दीच्या वेळी प्रवासी लोकलमधून पडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना थांबत नसल्याने पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधी गोरेगाव पूर्वेकडील वनराई पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. मात्र बदली झाल्यानंतर दहिसर पोलीस ठाण्यात रुजू झाले. अवघा एक दिवस दहिसर पोलीस ठाण्यात सेवा केल्यानंतर काल सकाळी हा अपघात झाला. यामुळे जगदाळे कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Mumbai Local Train Accident News
Cyclone Shakti : पूराने होरपळलेल्या महाराष्ट्रावर नवं संकट, IMD कडून चक्रीवादळाचा इशारा, अतिवृष्टी होणार

तज्ज्ञांच्या मते लोकल फेऱ्या वाढवणे, दरवाजे बंद लोकल सुरु करणे, कार्यालयीन वेळा बदलणे आणि पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे हे पर्याय चर्चेत असले तरी प्रत्यक्षात उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. लोकलमध्ये वाद, हाणामारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्याशिवाय प्रशासनाला वाढत्या गर्दीवर अद्याप तोडगा काढताच आला नाही.

Mumbai Local Train Accident News
Sharad Pawar Setback : शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्रात धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात जाणार

मुंबई लोकलमध्ये गर्दीने दररोज उच्चांक गाठला जातोय. सकाळच्या वेळेस लोकलमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. त्यात वेळेवर ऑफिस अन् घरी जाण्याची लोकांची पळापळ असते. अशावेळी लोकलच्या दारात अनेकजण उभे राहतात. तर गर्दीमध्ये जागा मिळाली नाही, धक्का लागला म्हणून अनेकदा वाद होतो. पण हा वाद जवानाच्या जीवावर बेतला आहे. लोकलच्या गर्दीमधील रेट्यामुळे लोकलच्या दारातून पडून जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.

Mumbai Local Train Accident News
Gautami Patil : चंद्रकांत पाटलांनी फोन फिरवला अन् म्हणाले गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com