Sharad Pawar Setback : शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्रात धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात जाणार

NCP setback ahead of Maharashtra local body polls : शरद पवार गटाला सांगलीत मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपात जाणार असल्याचे समोर आलेय. स्थानिक स्वराज्य स्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीमधील गळती काही थांबायचे नाव घेत नाही.

Sangli Politics : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात जोरदार धक्का बसला आहे. सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली. राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड भाजपात प्रवेश करणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ७ ऑक्टोबरला मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत शरद लाड यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. शरद लाड हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांचे नातू आहेत. शरद लाड यांच्या भाजप प्रवेशामुळे जयंत पाटलांना मोठा धक्का मानाल जातोय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. लाड यांनी रामराम केल्याचा फटका आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकते. लाड यांचे स्थानिक पातळीवर वजन होतं, जनसंपर्क दांडगा होता. याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com