Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Bullet Train Project : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाला वेग आला असून बीकेसी स्टेशनमधील ८० टक्के खोदकाम पूर्ण झाल्याची माहिती NHSRCLने दिली आहे.
Bullet Train Project
Bullet Train Project x
Published On

Bullet Train News : देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित मोठी माहिती समोर आली आहे. 'बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या काम वेग आला आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) स्टेशनवर आत्तापर्यंत ८० टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे', असे अधिकृत निवेदनात म्हटल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असल्याचा दावा एनएचएसआरसीएलने केला आहे.

बीकेसी आणि ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा या दरम्यानच्या २१ किमी लांबीच्या भूमिगत आणि समुद्राखालील बोगद्यांपैकी १६ किमी लांब बोगदे हे बोरिंग मशीन वापरुन खोदले जात आहेत आणि ५ किमी न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धतीच्या मदतीने खोदले जात आहे, असे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Bullet Train Project
Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

बीकेसी स्टेशन साइटच्या दोन्ही टोकांवर जमिनीच्या पातळीपेक्षा १०० फूट खोल बेस स्लॅब कास्टिंग आधीच सुरु झाले आहे. स्टेशनवरील खोदकामाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. याशिवाय विक्रोळी (५६ मीटर खोल) आणि सावली शाफ्ट (३९ मीटर खोल) येथे बेस स्लॅब कास्टिंग पूर्ण झाले आहे. बोगद्याचे बोरिंग मशीन सुरु करण्यासाठी आणि भूमिगत कामासाठी हे शाफ्ट आवश्यक आहेत अशी माहिती पीटीआयने दिली आहे.

Bullet Train Project
Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

महाराष्ट्रातील ठाणे, विरार आणि बोईसर एलिव्हेटेड स्टेशन्सवरील कामे प्रगतीपथावर आहेत. अनेक ठिकाणी खांब टाकण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत सुमारे ४४ किलोमीटर अंतराचे खांब तयार करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यात सात पर्वतीय बोगद्यांचे खोदकाम सुरु आहे. वैतरणा, उल्हास आणि जगणी नद्यांवर पुलांच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे, असे एनएचएसआरसीएलने म्हटले आहे.

Bullet Train Project
Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा एकूण खर्च १.०८ लाख कोटी रुपये इतका आहे. शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, भारत सरकार (केंद्र सरकार) या प्रकल्पासाठी एनएचएसआरसीएलला १०,००० कोटी रुपये देणार आहे. तर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांना बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी प्रत्येकी ५,००० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

Bullet Train Project
Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com