
सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण येथे आज सकाळी एक भीषण अपघात घडला. पंढरपूरहून दर्शन घेऊन घरी परत असलेल्या एका दाम्पत्याला अज्ञात टँकरने धडक दिल्याने पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी आहेत. सकाळी सुमारे १०.३० वाजता सोलापूर-पुणे नॅशनल हायवेवरील भिगवण येथे, रवींद्र सेल्स या दुकानाच्या समोर हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरहून दर्शन घेऊन मोटरसायकलवरून घरी परत असताना एका दाम्पत्याला अज्ञात टँकरने मागून धडक दिली. या अपघातात मल्हारी बाजीराव पवार (वय ५७ वर्षे, शेटकरी, येळपणे पोलीस वाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी पंखाबाई मल्हारी पवार (वय ५० वर्षे) या जखमी झाल्या. पंखाबाई पवार यांना लाईफ लाईन हॉस्पिटल, भिगवण येथे दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक पोलिसांनी टँकरचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून, गुन्हा नोंदवून चौकशी करत आहेत. अपघाताच्या ठिकाणी टँकरचा वेग, ड्रायव्हरची लापरवाही किंवा इतर कारणे याविषयी तपास केला जात आहे. या घटनेमुळे परिवारातील एकमेव कमावते सदस्याचा निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर गंभीर संकट आले आहे. पोलिसांनी टँकर ड्रायव्हरला लवकरात लवकर धरून कायद्याची योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
पंढरपूरवरुन घरी परतत असताना पवार दाम्पत्याच्या मोटरसायकलला टँकरने धडक मारली. या धडकीत मल्हारी पवार यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी पंखाबाई गंभीररित्या जखमी झाल्या. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील टँकरचालकाचा शोध सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.