Mumbai Water Supply Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Water Supply: मुंबईकरांसाठी मोठी बातमी; पाणी पातळी २२ टक्क्यांपर्यंत घटली, पाणी कपातीचा निर्णय नाही

Mumbai News: मुंबई शहरातील कमाल पाणीसाठ्याची पातळी २२ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. परंतु अजून पाणी कपात लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Rohini Gudaghe

मुंबईतील तापमानात वाढ होत आहे. शहरातील कमाल पाणीसाठ्याची पातळी २२ टक्क्यांपर्यंत घसरली (Mumbai Water Supply) आहे. गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी पाणी पातळी असल्याचं बीएमसीने म्हटले आहे. परंतु अजून पाणी कपात लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आकडेवारीनुसार, मुंबईचा पाणीसाठा २२ एप्रिल रोजी २१.८६ टक्के होता.

२२ एप्रिल २०२३ रोजी शहराचा पाणीसाठा २८.५६ टक्के होता, तर २०२२ मध्ये शहराचा एकूण पाणीसाठा ३१.२१ टक्के होता. एप्रिल आणि मे महिन्यात सरासरी पाणीसाठा दरवर्षी २० ते २५ टक्क्यांदरम्यान (Mumbai Water Crisis) असतो.तानसा, भातसा, मोडक सागर, तुळशी, वेहार, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या सात वेगवेगळ्या धरणांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. एप्रिल आणि मे महिन्यात सरासरी पाणीसाठा दरवर्षी २० ते २५ टक्क्यांदरम्यान असतो.

अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, राखीव पाण्यातील प्रत्येक १ टक्का पाणी वापरण्याच्या तीन दिवसांपर्यंत टिकते. सध्याचा पाणीसाठा दोन महिने पुरेल इतका आहे. मुंबईत मान्सून (Mumbai News) जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या पाणीकपात जाहीर करण्याची कोणतीही तरतूद नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बीएमसी पाणी कपात जाहीर करण्यापूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभागाशी सल्लामसलत करणार आहे. आतापर्यंत मान्सून उशिरा येण्याची कोणतीही घोषणा झालेली (Mumbai Water Cut) नाही.हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा चांगला मान्सून होईल. तरीही मेच्या पहिल्या आठवड्यात आयएमडीचा आढावा घेऊन त्यानंतर पुढील कारवाई करू.

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये, अधिकाऱ्यांनी राज्य पाटबंधारे विभागाला पत्र लिहून भातसा आणि अप्पर वैतरणा नद्यांमध्ये अडीच लाख एमएलडी राखीव पाणीसाठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यानंतर, सरकारने नागरी प्राधिकरणांना साठ्यातील सुमारे १.९८ लाख एमएलडी पाणी वापरण्यास मान्यता दिली आहे.

देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे मुंबईतील अनेक भागात आधीच पाणीकपात होत आहे. बीएमसीने मालाड, गोरेगाव, कांदिवली येथे २३ ते २४ एप्रिल दरम्यान २४ तासांसाठी १०० टक्के पाणीकपात जाहीर केली (Water Level) आहे. याआधी १८ ते १९ एप्रिल दरम्यान मध्य मुंबईतील दादर, माहीम, माटुंगा या भागात २५ ते १०० टक्के पाणीकपात नोंदवली गेली होती. हे धरणं मुंबईच्या सीमेवर आणि ठाणे आणि भिवंडी शेजारील जिल्ह्यांमध्ये आहेत. मुंबईला दररोज ४,२०० एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, सध्या बीएमसी केवळ ३,८५० एमएलडीचा पुरवठा करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack in bathroom: बऱ्याच जणांना बाथरूममध्येच हार्ट अटॅक का येतो? यामागे काय कारणं आहे, जाणून घ्या

Sanjay Shirsat : शिरसाटांच्या हातात सिगारेट अन् बेडवर पैशांनी भरलेली बॅग; संजय राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, VIDEO

Rohit Sharma : रोहित शर्माचा पत्ता कट होणार? कसोटीनंतर वनडेमध्येही शुभमन गिल कॅप्टन बनणार?

Panvel Corporation : शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावणे भोवले; मुख्याध्यापिका निलंबित, शिक्षणाधिकाऱ्यास बजावली नोटीस

Maharashtra Live News Update : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT