Thane Water Cut: ठाणेकरांनाे ! 'या' भागांत गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कारण

Thane Water Supply News: ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती जेल जलकुंभावरुन होणाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिनीचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
No Water Supply in Thane For Two Days (25 and 26 April 2024)
No Water Supply in Thane For Two Days (25 and 26 April 2024)Saam Digital

Thane News:

ठाणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागातर्फ येत्या गुरूवार (ता.25) सकाळी 9.00 ते शुक्रवार (ता. 26) सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तासाचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत उथळसर प्रभाग समिती जेल जलकुंभावरुन होणारा पाणीपुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे. (Maharashtra News)

ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती जेल जलकुंभावरुन होणाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिनीचे स्थलांतर करण्यात येणार आहे. हे काम करताना मुख्य वितरण वाहिनीला जोडकाम के व्हिला नाला पुलाचे कामासाठी बाधित होणार आहे.

No Water Supply in Thane For Two Days (25 and 26 April 2024)
Kolhapur Constituency : शाहू महाराज छत्रपतींना एमआयएमचा पाठिंबा, मराठा समन्वयक दिलीप पाटलांचे कोल्हापूरकरांना 'हे' आवाहन

हे काम करण्यासाठी पाणी पुरवठा विभागामार्फत गुरूवार 25 एप्रिल सकाळी 9.00 ते शुक्रवार 26 एप्रिल सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तासाचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दिवशी उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्र. 1 व 2, के व्हिला, आकाशगंगा, पंचगंगा, उथळसर, सेंट्रल जेल परिसर, पोलिस लाईन परिसर व नौपाडा प्रभाग क्षेत्रातील एन.के.टी. कॉलेज परिसर, खारकर आळी, पोलिस हायस्कूलच्या काही भागात पाणीपुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहील असे महापालिकेने कळविले आहे.

Edited By : Siddharth Latkar

No Water Supply in Thane For Two Days (25 and 26 April 2024)
Lok Sabha Election 2024 : माढातून शेकापची, सोलापूरात वंचितच्या उमेदवाराची माघार; राहुल गायकवाडांनी सांगितलं धक्कादायक कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com