Mumbai Water Problem : मुंबईकरांनो! पाणी जपून वापरा; या भागात या दिवशी राहणार पाणीपुरवठा बंद

Mumbai Water supply : पी दक्षिण विभागातील वीरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट, पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व) येथील जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. त्यामुळे २३ सकाळी १० पासून आणि २४ एप्रिल सकाळी १० पर्यंत मुंबईतील काही भागांत १०० टक्के पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे
Mumbai Water Problem
Mumbai Water Problem Saam Digital
Published On

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पी दक्षिण विभागातील वीरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट, पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व) येथील जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. त्यामुळे २३ सकाळी १० पासून आणि २४ एप्रिल सकाळी १० पर्यंत मुंबईतील काही भागांत १०० टक्के पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे, त्यामुळे संबंधित भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या भागात बंद राहणार पाणीपुरवठा

१. पी दक्षिण विभाग - वीटभट्टी, कोयना वसाहत, स्‍कॉटर्स वसाहत, कामा इंडस्‍ट्रीयल इस्‍टेट, रोहिदास नगर व शर्मा इस्‍टेट इत्‍यादी (मंगळवार, दिनांक २३ एप्रिल २०२४)

२. पी पूर्व विभाग - दत्त मंदीर मार्ग, दफ्तरी मार्ग, खोत कूवा मार्ग, खोत डोंगरी, मकरानी पाडा आणि हाजी बापू मार्ग, तानाजी नगर, कुरार गांव, रहेजा संकुल, साईबाबा मंदीर, वसंत व्‍हॅली, कोयना वसाहत (मंगळवार, दिनांक २३ एप्रिल २०२४)

३. आर दक्षिण विभाग – बाणडोंगरी, कांदिवली (पूर्व) (मंगळवार, दिनांक २३ एप्रिल २०२४)

Mumbai Water Problem
पनवेल : स्वारगेटला निघालेल्या एसटी बसला अपघात, 20 प्रवासी जखमी

४. पी दक्षिण विभाग - पांडुरंगवाडी, गोकूळधाम, जयप्रकाश नगर, नाईकवाडी, गोगटेवाडी, कन्‍यापाडा, कोयना वसाहत, आय. बी. पटेल मार्ग, यशोधाम, संतोष नगर, विश्‍वेश्‍वर मार्ग, प्रवासी इंडस्‍ट्रीयल इस्‍टेट, राजीव गांधी नगर, आरे मार्ग, श्रेयस वसाहत इत्‍यादी (बुधवार, दिनांक २४ एप्रिल २०२४)

५. पी पूर्व विभाग - पिंपरी पाडा, पाल नगर, संजय नगर, एम. एच. बी. वसाहत, इस्‍लामिया बाजार, जानू कम्पाउंड, शांताराम तलाव, ओमकार लेआऊट, पिंपरी पाडा, चित्रावणी, स्‍वप्‍नापूर्ती, घरकुल, गोकूळधाम, यशोधाम, सुचिताधाम, दिंडोशी डेपो, ए. के. वैद्य मार्ग, राणी सती मार्ग (बुधवार, दिनांक २४ एप्रिल २०२४)

Mumbai Water Problem
Mumbai Local News : मध्य रेल्वेवर तीन दिवस पॉवर ब्लॉक; लोकल ट्रेनच्या वेळेत मोठे बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com